E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इराणवरील हल्ले थांबविणार : ट्रम्प
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
वॉशिंग्टन
: पाच महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध समाप्तीसाठी कराराच्या अटींवर पश्चिम आशियातील मित्रदेशांचे एकमत झाले आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच इराणवरील हल्ले थांबविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, संभाव्य करार मार्गी लागताच होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली होईल अणि इराणपासून अणु धोकाही कमी होईल, असे त्यांनी शनिवारी सायंकाळी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केले. संपूर्ण जगाचे भले व्हावे, या हेतुने हल्ले थांबविण्याबाबतची विनंती मित्रदेशांकडून करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, यशस्वी आणि समृद्ध इराणचे अस्तित्व टिकवण्यासाठी, जलदगतीने करार करता आल्यास हल्ले रद्द करणे आवश्यक ठरणार आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारी रोजी पहिला हल्ला केल्यानंतर अनेकदा इराणवरील हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली आहे.. यानंतर पुन्हा युद्धाचा भडका अनेकदा उडाला देखील आहे. इराणचे संरक्षण मंत्र्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की,ट्रम्प यांच्या घोषणेचे आश्चर्य वाटत नाही. घोषणेनंतर आम्ही निष्क्रिय राहणरा नाही. अमेरिकेचा धोका पाहता आम्ही कायम सतर्क राहणार आहोत. . दरम्यान, नव्या प्रस्तावामुळे दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर पुन्हा येतील, अशी अपेक्षा निर्माण झाली. आहे.
विभागीय अधिकार्यांनी सांगितले की, आठवड्याअखेरीस ट्रम्प यांच्या घोषणेमुळे इराण आणि अमेरिका पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर येतील आणि कराराला अडथळा आणणार्या बाबींवर चर्चा करतील. मध्यस्थ असलेल्या एका अधिकार्याने सांगितले की, प्रस्तावानुसार होर्मुुझची सामुद्रधुनी खुली करणे आणि तेथील हल्ले थांबविणे आहे. त्यामध्ये इराकमधील इराण समर्थक दहशतवादी गट, आखाती देश आणि जॉर्डनमधील हल्ले थांबविण्याचा मुद्दा आहे. तात्पुरत्या करारानुसार अमेरिका इराणच्या बंदरावरील नाकेबंदी उठवेल आणि इराणला निर्यातीसाठी प्रोत्साहन देईल. हल्ले थांबविण्याच्या प्रक्रियेत इस्रायल देखील साथ देईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, इस्रायलने त्याबाबत सार्वजनिक मत व्यक्त केले नाही.
इराणच्या प्रतिहल्ल्यावर सौदी अरेबिया शांत
सौदीचे क्राऊन प्रिन्स यांनी ट्रम्प यांच्याशी शनिवारी चर्चा केली. त्यामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाची व्याप्ती वाढेल,अशी भीती व्यक्त केली. एका प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी इराणने आखाती देशातील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. सौदीच्या क्राऊन प्रिन्स यानी ट्रम्प यांनी आपली भूमिका नेमकी स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
Related
Articles
कर्नाटकात गुटखा आणि पानमसाल्यावर वर्षभर बंदी
13 Aug 2026
राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदा ढाबे, हॉटेल्सवर कारवाई
11 Aug 2026
एअर इंडिया विमान टर्ब्युलन्स प्रकरण
10 Aug 2026
एक कोटींपेक्षा अधिक विकासकामांसाठी आता तांत्रिक छाननी समिती बंधनकारक
14 Aug 2026
जवान कापसे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू
10 Aug 2026
न्युझीलंड ठरतोय भारतीय विद्यार्थ्यांची नवी पसंती
10 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू