अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे निधन   

न्यूयॉर्क : अमेरिकेतील ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे  निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ’द सोप्रानोज’ चित्रपटातील त्यांचे ’साल्वाटोर बॉनपेन्सिएरो’ पात्र गाजले होते. गुंड व कठोर स्वभावाच्या व्यक्तींच्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अशी त्यांची ओळख होती.व्हिन्सेंट पास्टोर यांचा जन्म ब्रॉन्क्समध्ये झाला आणि ते न्यूयॉर्कमधील उपनगरीय न्यू रोशेलमध्ये वाढले. व्हिएतनाम युद्धादरम्यान ते नौदलात भरती झाले होते. नंतर पेस युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी  शिक्षण घेतले होेते. दरम्यान, त  न्यूयॉर्कमधील ’सिटी आयलंड’ येथील घरात पास्टरो हे मृतावस्थेत सापडले होते. त्यांची एक दानशूर व्यक्‍ती म्हणून ख्याती होती. कोणालाही मदत करण्यासाठी ते मागेपुढे पाहात नसत.

Related Articles