E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दरोड्याच्या गुन्ह्यातील पोलिस कर्मचारी मोकाट
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह...
पुणे
: नवले पूल परिसरात घडलेल्या एक कोटींच्या दरोड्यातील दाखल गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेल्या खेड शिवापूर पोलिस चौकीतील महिला पोलिस हवालदारासह पोलिस शिपाई गेल्या पंधरा दिवसांपासून मोकाटच आहेत. यापूर्वी या प्रकरणात चार जणांना अटक झाली असली तरी अनेक आरोपी फरारी आहेत. येथील आरोपींना अटक करण्यात सध्या पोलिस अपयशी ठरले आहेत. तसेच, पोलिसांचा तपास देखील संथगतीने सुरू असल्याने आता पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजिज जब्बार इसुब मेस्त्री (वय-39) आणि प्रमिला शरद निकम (वय-44) अशी त्यांची नावे आहेत. सध्या हे दोघेही फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी नर्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी यापूर्वीच विक्रम चाकणकर (वय-44), अमेय अरविंद कार्ले (वय-46) आणि गणेश रमेश कदम (वय-वय-33, सर्व रा. धायरी) यांच्यासह तोतया पत्रकार आशिष तिवारी याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी अभिजीत ऊर्फ बटर्या बाळासाहेब गाडे (रा. आंबेडकर वसाहत, धायरी) दाऊद सय्यद नदाफ (रा. बेनकर वस्ती, धायरी) आकाश ऊर्फ मुन्ना संजय गायकवाड (वय-32, रा. कासुर्डी, भोर) प्रमोद विजयकुमार यादव (वय-20, रा. गाउडदरा फाटा, हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांचाही शोध सुरु आहे.
हर्षवर्धन पवार हे 18 जुलै रोजी दुपारी सहकारी किरण आपटे यांच्यासह आपल्या मोटारीतून नवले पुलाजवळ असलेल्या बँकेच्या दिशेने जात होते. अचानक काही जणांनी त्यांचे मोटार अडवले. ’आम्ही पोलिस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात’, असे सांगत आरोपींनी मोटारीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यावेळी आरोपींनी मोटारीतील एक कोटींची रोकड असलेल्या दोन्ही पिशव्या हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आपटे हे 73 लाखांची घेऊन ते निघून गेले. त्यामुळे ही रक्कम वाचली. या नंतर आरोपींनी पवार यांच्या मोटारीत बसवून त्यांना थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत नेले. त्याठिकाणी त्यांच्या ताब्यातील दुसर्या पिशवीतील 26.50 लाखांपैकी 20 लाख काढून घेण्याचा प्रयत्न झाला.
महिला पोलिस प्रमिला निकम व पोलिस शिपाई मेस्त्री यांच्या मदतीने आणि तोतया पत्रकार आशिष तिवारीने ती रक्कम स्वत:च्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. मात्र, प्रकरण आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी ती रक्कम पुन्हा पिशवी ठेवली. खेड शिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. पुढील तपास राजगड पोलिस करीत आहेत.
पोलिसांचे अभय
एक कोटींची रोकड लुटण्याचा कट रचणार्या या पोलिसांच्या पाठीवर नेमका कोणाचा हात आहे, त्यांना खात्यातूनच कोणी गुप्त माहिती पुरवून पळून जाण्यास मदत करत आहे का, जर पोलिसच दरोडेखोरांना पाठीशी घालणार असतील, तर जनतेने सुरक्षेसाठी कोणाकडे पहावे, असा गंभीर प्रश्न देखील नागरिकांकडून विचारला जात आहे.
दिरंगाई कशामुळे?
या गुन्ह्यात थेट पोलिस नाईक अजिज मेस्त्री आणि महिला पोलिस अंमलदार प्रमिला निकम या दोन पोलिसांचा मुख्य सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दोघांना निलंबितही करण्यात आले आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा घडून 15 दिवस झाले तरीही पोलिस स्वतःच्याच विभागातील या दरोडेखोर पोलिसांना अटक करू शकलेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, दोन पोलिसांसह एकूण सहा आरोपी अजूनही राजरोसपणे फरार आहेत.
Related
Articles
तृणमूलचे माजी आमदार घोष यांना जमावाकडून मारहाण
15 Aug 2026
गोंधळ थांबवा (अग्रलेख)
12 Aug 2026
जिंकले कोणीच नाही (अग्रलेख)
17 Aug 2026
मुळा-मुठा नदी प्रदूषणमुक्तीला गती
12 Aug 2026
नक्षलवादी मानसिकतेवर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण द्यावे : सुप्रिया सुळे
18 Aug 2026
कांद्याच्या दरात 10 रुपयांनी वाढ
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा