E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीच्या 500 नवीन बस लवकरच सेवेत
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
पुणे
: शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने दाखल होणार्या 500 सीएनजी बसची निर्मिती आता अंतिम टप्प्यात आली आहे. या बसच्या नमुन्याची केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था आणि पीएमपीच्या तांत्रिक अधिकार्यांकडून पाहणी करण्यात आली.
या नवीन बसमध्ये अत्याधुनिक स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली असून तिची प्रत्यक्ष चाचणीही यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. दोन टप्प्यात या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. नवीन 500 बसचा पुरवठा करण्यासाठी ‘ट्रॅव्हल टाइम’ आणि ‘अँथनी’ या दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोपोलीजवळील पाताळगंगा येथील ‘अँथनी गॅरेज’मध्ये सध्या या बसची बांधणी सुरू आहे. शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस ‘सीआयआरटी’ आणि ‘पीएमपी’च्या पथकाकडून 12 मीटर लांबीच्या सीएनजी बसच्या नमुन्याची पाहणी केली. अशोक लेलँड कंपनीच्या चेसिसवर या बसची बांधणी केली जात आहे.नमुन्याच्या पाहणीदरम्यान अधिकार्यांनी बसच्या रचनेत काही किरकोळ बदल सुचवले आहेत. यामध्ये शेवटच्या रांगेतील आसनांची जागा बदलणे आणि काही अँगलमधील बदलांचा समावेश आहे. हे बदल करून सीआयआरटीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या बसच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वेग येणार आहे.
सीएनजी बसची वैशिष्ट्ये
बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा
या यंत्रणेत नायट्रोजनयुक्त अग्निशामक
दोन टप्प्यांत बस मिळणार
‘पीएमपी’ला दोन टप्प्यांत बसचा ताबा मिळणार आहे. 500 पैकी पहिल्या टप्प्यातील 250 बस येत्या दोन ते अडीच महिन्यांत ‘पीएमपी’ला मिळतील. त्यानंतरच्या पुढील अडीच महिन्यांत दुसर्या टप्प्यातील उर्वरित 250 बस ताफ्यात दाखल होतील. म्हणजेच, आगामी पाच ते सहा महिन्यांत या सर्व 500 बस पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
’सीआयआरटी’च्या पथकासह नमुन्याची पाहणी केली. यात संबंधित कंपनीला काही बदल सुचविले आहेत. लवकरच बसच्या उत्पादनाला सुरुवात होईल.
- महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपीएमपीएमएल, पुणे
Related
Articles
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना
17 Aug 2026
उद्योग का बंद झाले? (अग्रलेख)
14 Aug 2026
इराणवर अण्वस्त्र डागणार?
18 Aug 2026
रशियाच्या आंतरराष्ट्रीय लवादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड मध्यस्थ
14 Aug 2026
शिरूर बाह्यवळण जवळील रस्ता बनला धोकादायक
14 Aug 2026
कुंभवडे धबधब्यावर ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश बंदी
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा