काठमांडू : ब्रिटन : नेपाळचे गिर्यारोहक निर्मल पुर्जा (वय 43) यांचा मृतदेह रविवारी सापडला आहे.याबाबतची माहितीएलिट एक्स्पेड संस्थेने दिली. व्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बल्टिस्तान परिसरातील बोर्ड पीक येथे नुकताच हिमकडा कोसळला होता. त्या खाली निर्मल पुर्जा आणि अन्य नऊ गिर्यारोहक गाडले गेले होते. दरम्यान, पुर्जा यांच्यासोबत नेपाळमधील पाच गिर्यारोहक साथीदार, एक पाकिस्तानचा, एक ओमनचा, एक अमेरिकेचा आणि एक चीनचा होता.त्यांच्यावर गुरुवारी कारकोरमजवळ हिमकडा कोसळला होता. निर्मल पुर्जा यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी शनिवारी देण्यात आली होती. त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती इलाईट एक्सपेड संस्थेने काल दिली.. त्यांनी असेही सांगितले की, पुर्जा यांच्यासोबतचा अन्य गिर्यारोहक दुर्घटनेत वाचलेला नाही.
Fans
Followers