केरळम्मधील विमानतळांवर आठ किलो सोने जप्त   

तिरूअनंतपुरम : केरळम्मधील विविध विमानतळांवर गेल्या आठवडाभरात सीमा शुल्क विभागाने आठ किलो सोने जप्त केले असून, त्याची किंमत 11 कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क आयुक्त टी. टीजू यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या प्रकरणांमध्ये गेल्या आठवड्यात एकूण 14 गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये केरळम्मधील सहा आणि तामिळनाडूतील तीन जणांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय संघटित सोन्याच्या चोरट्या व्यापाराच्या नव्या पद्धतींना आळा घालण्यासाठी प्रवाशांची प्रोफाइलिंग, गुप्त माहिती संकलन आणि विविध तपास यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यात आल्याचे टीजू यांनी सांगितले.

Related Articles