भाटघर धरण शंभर टक्के भरले   

नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा

भोर,(प्रतिनीधी) : पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान असलेले भाटघर धरण  रविवारी दुपारी  सकाळी साडेचारच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. पुणे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांनी ही माहीती दिली. विद्युत निर्मिती केंद्राव्दारे 1615 तर सांडव्याव्दारे स्वयंचलीत व्दारातून 1000 असा 2615 क्युसेक  विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्यास विसर्ग कमी जास्त केल जाईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. या धरणाला 45 स्वयंचलीत तर 36 उघडझाप करण्याचे दरवाजे आहेत.धरणाची पाणी साठवण क्षमता 23.75  टीएमसी इतकी आहे. धरणाच्या डाव्या कालव्याची सिंचन क्षमता 37070 तर उजवा कालवा 65506 हेक्टर आहे. राज्यातील स्वयंचलीत दरवाजे असलेले हे एकमेव धरण आहे. रविवारी अखेरपर्यंत  720 मी.मी.पाउस झाला आहे. 1927 मध्ये धरणाचे बांधकाम झाले. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
निरा उजवा व डावा कालव्याचे तालुका निहाय लाभक्षेत्र. निरा डाव्या कालव्यावर पुणे जिल्ह्यातील 37070 हेक्टर तर उजव्या कालव्यावर सातारा व सोलापूर जल्ह्यातील 65506 हेक्टर असे नीरा प्रणालीवर पुणे, सातारा, सोलापूर जल्ह्यातील एकूण 102576 हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षेत्र आहे. तालुका निहाय डाव्या कालव्यावर पुरंदर (420 हे.), बारामती (13780 हे.), इंदापूर(  22870 हे.) तर उजव्या कालव्यावर खंडाळा (106 हे.), फलटण (22158 हे.), माळसिरस (32236 हे.), पंढऱपूर (5656 हे.), सांगोला (2350 हे.) इतके आहे.

Related Articles