E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आळे-बोरी बुद्रुक रस्त्यावर खड्डेच खड्डे;रस्ता गेला कुठे?... वाहनचालकांचा संताप
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
बेल्हे
, (वार्ताहर) : आळे-बोरी बुद्रुक या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, असा प्रश्न वाहनचालकांना पडू लागला आहे.सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून रस्ता आणि खड्डा यातील फरकच ओळखता येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, मोटार चालक आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना दररोज मोठी कसरत करावी लागत असून अनेकदा वाहनांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत.
गेल्या काही दिवसांत या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडले असून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.हा रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे. रस्ता दुरुस्त होणार कधी? हा प्रश्न आता प्रत्येक वाहनचालकाच्या मनात निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
Related
Articles
पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटू खेळवणार
14 Aug 2026
नवभारताच्या उत्थानासाठी तरुणाई सज्ज : मुख्यमंत्री
12 Aug 2026
लष्करी श्वान ’टायसन’चा गौरव
17 Aug 2026
राज्यात १८३ ठिकाणी एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण
18 Aug 2026
कार्टिंगच्या फॉर्म्युला-1 मध्ये अतिका मीरची प्रभावी कामगिरी
12 Aug 2026
शहरातील स्वच्छतागृहांची सफाई करण्यात येणार
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा