E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
श्री महागणपती मंदिरात भाविकांची गर्दी
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
रांजणगाव गणपती
, (प्रतिनिधी) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा जयघोष करण्यात आला. मंदिर सुशोभीकरण कामांमुळे साडेतीन महिन्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले झालेले मंदिर, रविवारची साप्ताहिक सुट्टी व संकष्टी चतुर्थी यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. संकष्टी चतुर्थी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे भाविकांसाठी मंडप व्यवस्था इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आल्या, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
संकष्टी चतुर्थी निमित्त रविवारी दुपारी 12 वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. गणेशभक्त व येथील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभार्यात व देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिराला विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. दुपारी येथील श्री महागणपती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोर्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके तसेच देवस्थान कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, चतुर्थीमुळे मंदिर व परिसरात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Related
Articles
सिंधूच्या पाण्याबाबत तडजोड नाही; शाहबाज यांची दर्पोक्ती
15 Aug 2026
होर्मुझवर अमेरिकेचे नियंत्रण : ट्रम्प यांचा दावा
14 Aug 2026
इराणकडून आडमुठेपणा; ट्रम्प यांचा आरोप
17 Aug 2026
भारताकडे 178 धावांची आघाडी
18 Aug 2026
बंद पडलेल्या कंपन्यांपैकी ७८ टक्के कंपन्यांचे अस्तित्व कागदावरच होते !
14 Aug 2026
घोडगंगा कारखान्याला मिळणार नवसंजीवनी
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा