E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
काही भागांत कमी पाऊस पडल्यामुळे मागणीत वाढ
नवी दिल्ली
: देशातील काही भागांत कमी पाऊस पडल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची विक्री जुलैमध्ये वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. शेतकरी, मोटारचालक अणि उद्योगजगताकडून इंधनाची मागणी वाढल्याने विक्री वाढल्याचे आकडेवारीवारीवरुन स्पष्ट होत आहे.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी सांगितले की, जुलैमध्ये 9.7 टक्के अर्थात 3.45 दशलक्ष टन पेट्रोलची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 3.14 दशलक्ष टनाची विक्री झाली होती. जुलै 2024 मध्ये 15.1 टक्के अर्थात 2.99 दशलक्ष टन, त्यापूर्वी 2023 मध्ये सर्वाधिक 36.1 टक्के विक्री झाली होती. जूनचा विचार करता पेट्रोलच्या विक्रीचे प्रमाण 1.1 टक्क्यांनी कमी अर्थात 3.48 टन झाले. डिझेलची विक्री ही देशाच्या आर्थिक उलाढालीचा निर्देशांक आहे. त्याची विक्री 10.7 टक्के अधिक झाली.
गेल्या वर्षी जुलैमध्ये विक्री 6.43 दशलक्ष टनाची तर यंदा प्रमाण वाढून ते 7.12 दशलक्ष टन एवढे झाले. देशात इंधन म्हणून डिझेलचा सर्वाधिक वापर केला जातो. प्रामुख्याने मालवाहतूक, कृषी यंत्रसामग्री आणि सिंचनासाठी ऊर्जा पुरवण्यासाठी त्याचा अधिक वापर केला जातो. मान्सून काही ठिकाणी कमी पडल्यामुळे पेरणीच्या मुख्य हंगामात सिंचनाची मागणी वाढली आहे .जुलै महिन्यातील विक्रीचे प्रमाण 2024 मधील याच कालावधीच्या तुलनेत 11.5 टक्क्यांनी आणि जुलै 2023 मधील वापराच्या तुलनेत 12.7 टक्क्यांनी अधिक होते.
मान्सून आणि इंधनाच्या विक्रीचे गणित..
मान्सूनच्या आगमनानंतर इंधनाच्या विक्रीत साधारणपणे घट होते. कारण त्यामुळे शेतीतील सिंचनाचे पंप चालवण्याची मागणी कमी होते आणि वाहनांची ये-जाही मंदावते. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे, शेतांना पाणी देण्यासाठी पंप चालवण्यासाठी शेतकर्यांना डिझेलचा वापर करावा लागला. जुलै महिन्यातील विक्री ही त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत कमी असते; याचे कारण म्हणजे जूनमध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी किंवा प्रवासासाठी बाहेर पडणार्यांचे प्रमाण वाढलेले असते.
Related
Articles
विकसित राष्ट्राचे स्वप्न (अग्रलेख)
18 Aug 2026
पोलिस आयुक्तालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात
17 Aug 2026
’डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन 10 कोटी 74 लाखांची फसवणूक
13 Aug 2026
कांद्याच्या दरात 10 रुपयांनी वाढ
18 Aug 2026
भारताकडे 178 धावांची आघाडी
18 Aug 2026
नौदलाच्या जवानासह पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा