E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ब्रिटनमध्ये चीनच्या ‘सुपर दूतावासा’चा मार्ग मोकळा
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
स्थानिकांचा विरोध न्यायालयाने फेटाळला
लंडन
: ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये चीनच्या प्रस्तावित ‘सुपर दूतावास’ प्रकल्पाला अखेर इंग्लंडच्या उच्च न्यायालयाची मंजुरी मिळाली आहे. ऐतिहासिक रॉयल मिंट कोर्ट परिसरात उभारण्यात येणार्या या दूतावासाविरोधातील रहिवाशांच्या संघटनेचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत सरकारच्या निर्णयाला वैध ठरवले. त्यामुळे या बहुचर्चित प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लंडनमधील रॉयल मिंट कोर्ट रेसिडेंट्स असोसिएशनने या प्रकल्पाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. रहिवाशांच्या मते, चीनचा हा दूतावास आकाराने मोठा असून, त्यामुळे परिसरातील सुरक्षा, गोपनीयता आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या प्रकरणासाठी संघटनेने हजारो पौंडांचा निधीही उभारला होता.मात्र, न्यायमूर्ती नथाली लीव्हेन आणि लॉर्ड जस्टिस जेम्स डिंगेमन्स यांच्या खंडपीठाने सरकारने बांधकाम परवानगी देताना सर्व बाबींचा विचार केला असल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रक्रियेत रहिवाशांच्या संघटनेवर कोणताही अन्याय झाल्याचे आढळत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाचा निर्णय प्रतिकूल असला तरी रहिवाशांची संघटना मागे हटण्यास तयार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुढील अपील करण्यासाठी संघटना आणखी निधी गोळा करणार असून, गरज पडल्यास हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.चीनने 2018 मध्ये ऐतिहासिक रॉयल मिंट कोर्ट ही जागा 22.5 कोटी पौंडांमध्ये विकत घेतली होती. त्यानंतर येथे सध्या पोर्टलंड प्लेस येथे असलेल्या सध्याच्या दूतावासापेक्षा अधिक मोठे आणि आधुनिक दूतावास उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रकल्पावर स्थानिक नागरिकांकडून सातत्याने सुरक्षा आणि धोरणात्मक आक्षेप घेतले जात आहेत.
Related
Articles
ई रिक्षातील स्फोटात मामा-भाच्याचा मृत्यू
18 Aug 2026
वैयक्तिक कर्जांच्या थकबाकीमुळे कंपन्यांच्या चिंतेत वाढ
14 Aug 2026
जात आणि आधारचे तपशील जनगणनेत होणार समाविष्ट
15 Aug 2026
वाचक लिहितात
14 Aug 2026
होर्मुझ सामुद्रधुनी अनिश्चित काळासाठी बंद करू
15 Aug 2026
विचारांशी प्रामाणिक पत्रकारिताच समाजासाठी दीपस्तंभ : गडकरी
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा