E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
डीपफेक आणि एआयच्या गैरवापरावर युरोपीय संघाचा लगाम
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथक
ब्रुसेल्स
: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर आटोक्यात आणण्यासाठी युरोपीय संघाने कंबर कसली आहे. एआयच्या माध्यमातून तयार होणारे डीपफेक, बनावट छायाचित्रे-चित्रफिती, सायबर हल्ले आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.जगभरात एआय तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असताना त्याचा लोकशाही, अर्थव्यवस्था आणि समाजावर होणार्या दुष्परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, युरोपीय संघाच्या नव्या एआय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे विशेष पथक कामाला लागणार आहे. नव्या कायद्यानुसार, एआय कंपन्यांना त्यांनी तयार केलेल्या छायाचित्र, चित्रफिती किंवा इतर कोणत्याही मजकुरावर स्पष्ट लेबल किंवा डिजिटल वॉटरमार्क लावणे बंधनकारक असणार आहे. यामुळे कोणती सामग्री कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करण्यात आली आहे, याची माहिती नागरिकांना सहज मिळू शकेल.
तज्ज्ञांची नियुक्ती
युरोपीय संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मते, एआय तंत्रज्ञान अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि जबाबदार बनविण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या नियमांमुळे एआयचा वापर समाजहितासाठी सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी ब्रुसेल्समधील युरोपीय संघाच्या एआय कार्यालयाचा विस्तार केला जात असून, तिथे अतिरिक्त 38 तज्ज्ञ कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे विशेष पथक नव्या स्टार्टअप्सपासून ते ओपनएआय आणि डीपसीक सारख्या एआय कंपन्यांच्या कामकाजावर नजर ठेवणार आहे.
Related
Articles
कर्जाच्या विळख्यात अडकतोय मध्यमवर्ग?
18 Aug 2026
ऐतिहासिक ध्वज आणि मादाम कामांचा स्वातंत्र्य संदेश
18 Aug 2026
रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ अखेर गोगवले यांच्या गळ्यात
18 Aug 2026
19 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
18 Aug 2026
व्हॉट्सऍप कट्टा
18 Aug 2026
रेणावी घाटात भीषण अपघातात दोन ठार
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा