E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
विमान इंधनाच्या दरात वाढ
नवी दिल्ली
: हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लागणार्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग दुसर्या महिन्यात कपात करण्यात आली. तर, जेट इंधनाच्या किमतीत (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल-एटीएफ) वाढ करण्यात आली आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 192 रुपयांची कपात करण्यात आली. जून महिन्यात 183.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. एकंदरित, दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 372 रुपयांची कपात झाली आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता 2,930 रुपयांवरून 2,738 रुपयांवर आला आहे.
एटीएफच्या दरात प्रति लीटर पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील एटीएफ दर प्रति लीटर 110 रुपयांवरुन 115 रुपयांवर पोहोचला आहे. जून महिन्यात यात पाच रुपयांची कपात करण्यात आली होती. याचाच अर्थ, एटीएफचा दर आता पूर्वीप्रमाणेच झाला आहे. पश्चिम आशियातील संकटानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीचा भडका उडाला होता. जून महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले होते.फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला होता. त्यावेळी व्यावसायिक सिलिंडर 1,373 रुपयांना मिळत होता. मात्र, जूनपर्यंत टप्प्या-टप्प्यात हा दर 3,113.50 रुपयांवर पोहोचला.
दरम्यान, पाच किलोच्या सिलिंडरच्या दरातही 46 रुपयांची कपात करण्यात आली. मागील महिन्यात पाच रुपयांची कपात केली होती. आता पाच किलो वजनाचा सिलिंडर 762 रुपये दराने मिळणार आहे.घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे 14.2 किलोचा घरगुती सिलिंडरचा दर 942 रुपयांवर कायम आहे.जून महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती.पश्चिम आशियातील संकटामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा जागतिक पुरवठा विस्कळीत झाला होता. मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात 70 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, घरगुती सिलिंडरचे दर दर उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी प्रति सिलिंडरमागे 503 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ए. एस. सहानी यांनी सांगितले.दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मे महिन्यात टप्प्या-टप्प्यात प्रत्येकी 7.50 रुपयांची वाढ केली होती. राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे.
Related
Articles
इम्रान यांच्या नातेवाईकांच्या भेटीवर न्यायालय घेणार निर्णय
15 Aug 2026
डीएसकेच्या गुंतवणूकदारांना दिलासा
14 Aug 2026
‘एफ-१’ व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळेना...
14 Aug 2026
बुमरा सलग 21 महिन्यांपासून कसोटीत अव्वल
13 Aug 2026
वाचक लिहितात
14 Aug 2026
तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला केराची टोपली
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा