नागरी उड्डाण क्षेत्रात भारताची अभूतपूर्व प्रगती : मोदी   

विमानतळांची संख्या 74 वरून 166 वर  

अमरावती : देशाच्या नागरी उड्डाण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असून, देशातील विमानतळांची संख्या 74 वरून वाढून थेट 166 वर पोहोचली आहे, म्हणजेच ही संख्या दुपटीहून अधिक झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम येथील नवनिर्मित ‘अल्लूरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे’ (भोगपुरम विमानतळ) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. हा नवीन प्रकल्प आंध्र प्रदेशच्या, विशेषतः उत्तर आंध्रच्या विकासासाठी एक प्रभावी ‘रनवे’ म्हणून काम करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.मोदी म्हणाले, 2014 पर्यंत देशात फक्त 74 चालू विमानतळ होते. एके काळी विमान प्रवास हा केवळ मोठ्या शहरांपुरता आणि श्रीमंत लोकांपुरताच मर्यादित मानला जात होता; परंतु, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज छोट्या-छोट्या शहरांमधील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकही सहजपणे विमानाने प्रवास करत आहेत.

Related Articles