कृष्णा नदीचे पाणी महागणपती मंदिरात   

धोम धरणातून 6335 क्युसेक विसर्ग

सातारा, (वार्ताहर) : वाई तालुक्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग दुपारी तीन वाजता चार हजार 964 क्युसेक तर सायंकाळी 6 वाजता तो सहा हजार 335 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तीरावरील महागणपती मंदिरासह अनेक मंदिरांत पाणी शिरले आहे.
 
शहर व परिसरात काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. आज सकाळपासून तो आणखी वाढत गेला. तालुक्याच्या पश्चिम भागात अद्यापही पाऊस सुरू आहे. आज दिवसभरात धोम बलकवडी पाणलोट क्षेत्रात 68 मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण 2156 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 1599 क्युसेक पाणी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी 810.82 मीटर झाली असून, पाणीसाठा 3.60 टीएमसी इतका झाला आहे. धरण 88.29 टक्के भरले आहे. या धरणातून 1055 क्युसेक पाणी धोम धरणात येत आहे, तर धोम धरण पाणलोट क्षेत्रात 24 मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण 679 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 3282 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी 745.47 मीटर झाली आहे. सद्यःस्थितीत धोम धरणामध्ये 12.07 टीएमसी (89.13 टक्के) पाणीसाठा झाला आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी 11 वाजता होणारा 2412 क्युसेक विसर्ग दुपारीनंतर वाढविण्यात आला आहे.

Related Articles