E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरली
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
पुणे
: शहर, उपनगर आणि शहराला पाणी पुरवठा करणार्या धरण क्षेत्रासह शहरात मागील आठ दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम आहे. आणखी पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील धरणे भरली आहेत.
पुण्याला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला, पानशेत, वरगाव आणि टेमघर धरणांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच धरण क्षेत्र परिसरात असणार्या घाट माथ्यावरही जोरदार पाऊस कायम आहे. त्यामुळे डोंगरावरून धरणात वाहून येणार्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. चारही धरणे भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. धरणे भरली असल्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.
शहर आणि उपनगरात काल सकाळपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे मध्य वस्तीतील रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी होती. विशेष म्हणजे अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. त्यात पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तर काही ठिकाणच्या सखल भागात साचलेले पाणी कायम आहे. त्यामुळे सकाळी विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेकांना भिजत तसेच वाहतूक कोंडीचा सामना करत निश्चितस्थळी पोहचावे लागले.
धरण क्षेत्रातही सातत्याने पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वीच खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण शंभर टक्के भरले आहे. तर टेमघर धरण 95.50 टक्के भरले आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस तसेच डोंगरमाथ्यावरून वाहून येणार्या पावसाच्या प्रमाणात धरणांतून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मुठा नदी मागील तीन दिवसांपासून दुधडी वाहत आहे. वाहतूकीसाठी नदीपात्रातील रस्ता बंद करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत पाऊस कायम राहिल्याने सकाळी भिजत प्रवास केलेल्या नागरिकांना सायंकाळी पुन्हा भिजतच घर गाठावे लागले. सायंकाळनंतरही शहरासह उपनगरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे चित्र होते.
धरणातील पाण्याची स्थिती
धरण
पाऊस
टीएमसी
टक्केवारी
खडकवासला
10 मिमी
1.97
100
पानशेत
37 मिमी
10.65
100
वरसगाव
36 मिमी
12.82
100
टेमघर
55 मिमी
3.54
95.50
एकूण
138 मिमी
29.01
99.54
घाटमाथ्यावरील पावसाची स्थिती
ठिकाण
पाऊस
ताम्हिणी
200 मिमी
शिरगाव
140मिमी
दवंडी
132 मिमी
भीरा
105 मिमी
लोणावळा
103मिमी
पुण्यात पडलेला पाऊस
ठिकाण
पाऊस
लोहगाव
13.4 मिमी
एनडीए
8.5 मिमी
शिवाजीनगर
7.3 मिमी
पाषाण
6.4 मिमी
कोरेगावपार्क
5.5मिमी
Related
Articles
भाजप प्रवक्ते पूनावाला यांचा राजीनामा
18 Aug 2026
आंबेनळी घाट तीन दिवस बंद
14 Aug 2026
अफगाणिस्तानच्या अखंडता, सार्वभौमत्वाला धोका पोहचल्यास गंभीर परिणाम होतील
17 Aug 2026
रोखे विक्रीतून पाचशे कोटींची विक्रमी उभारणी
14 Aug 2026
उद्योग का बंद झाले? (अग्रलेख)
14 Aug 2026
केशवनगर-खराडी उड्डाणपुलाचे उद्घाटन
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा