विविध संघटनातर्फे लोकमान्य टिळक यांना अभिवादन   

पुणे : लोकमान्य टिळक यांना 106 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक सरदार विंचुरकर वाड्यातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रविंद्र पठारे, संजय मते, प्रविण करपे, नंदकुमार जाधव, रामदास नेहूलकर, सिद्धार्थ गोडसे, अनिल सपकाळ उपस्थित होते. 
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे लोकमान्यांच्या पुतळ्यास शहर भारतीय जनता पक्ष शासकीय योजना आघाडीच्या वतीने पुष्पाहार अर्पण करण्यात आला. यावेळी किरण वैष्णव, महेश सकट, अश्‍विनी कुमार चिन्नी, सुशांतदास चौधरी, बद्रीनाथ जन्नू उपस्थित होते.रमाबाई आंबेडकर व्यापारी संघटना व लक्ष्मण सवाने विचार मंचाचे अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी नीलम खुडे, अमर दौंडकर, राजेश देवकाते, हनुमंत मिसाले, नागेश बोबडे, सचिन पवार, कृष्णा जाधव, फिरोज तांबोळी, असद शेख, महेंद्र कांबळे उपस्थित होते. 
 
अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शीतल शिटे यांनी लोकमान्यांच्या राष्ट्रभक्ती, स्वराज्याची संकल्पना आणि शिक्षण व समाजजागृतीतील योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले. बहुजन विकास आघाडीच्यावतीने लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष धनंजय घोलप, सनी रायकर, मृत्यूंजय सोरटे, विशाल पाटोळे, विशाल गायकवाड, कपिल वाघमारे उपस्थित होते. प्रियदर्शन शिक्षण संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन आदरांजली वाहिली. यावेळी शशिकला कुंभार, महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार उपस्थित होते. 

Related Articles