E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची कामे मुदतीत पूर्ण करा
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश
पिंपरी
: भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत करण्यात येत असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.पिंपरी चिंचवड शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता भामा आसखेड धरणातून 60.79 द. ल. घ. मी. इतका पाणी कोटा आरक्षणास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याअंतर्गत भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याकरिता चालू असलेल्या विविध प्रकल्पास आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भेट दिली.यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दिपक पाटील, उपअभियंता दिनेश फाटक, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांच्यासह संबंधित कामांचे ठेकेदार व सल्लागार उपस्थित होते.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत चालू असलेल्या भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील बी.पी.टी.पर्यंतच्या 1700 मि.मी. व्यासाची उदंचन नलिका टाकणे, नवलाख उंबरे येथील बी.पी.टी. ते देहूपर्यंत 1400 मि.मी. व्यासाची गुरुत्व नलिका टाकणे तसेच भामा आसखेड धरण येथील जॅकवेल बांधणे या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष धरणाच्या पाण्याखालील 100 फूट खोल बोगद्याची पाहणी केली. तसेच या सर्व कामांचा आढावा घेऊन उर्वरित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी, कामाचे सल्लागार व ठेकेदार यांना सूचना दिल्या.
Related
Articles
शिरूर बाह्यवळण जवळील रस्ता बनला धोकादायक
14 Aug 2026
महापौर निवासाचे ‘रामदूत’ नामकरण वादात
12 Aug 2026
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
18 Aug 2026
चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे निधन
13 Aug 2026
राहुल आणि सोनिया गांधींविरोधात तक्रार
18 Aug 2026
30 टन मासळी, 700 टन चिकन, 2 हजार बोकडांची विक्री
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा