E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रीती, जासमीनचा ‘सुवर्ण’पंच
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
ग्लासगो
: भारतीय महिला मुष्टियोद्ध्या प्रीती पवार आणि जैसमीन लांबोरियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत अनुक्रमे 54 किलो आणि 57 किलो वजनी गटात सुवर्णपदके जिंकली. मात्र, पुरुषांच्या 55 किलो गटाच्या अंतिम सामन्यात जादूमणी सिंगला पराभव स्वीकारावा लागला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.महिलांच्या 54 किलो गटाच्या अंतिम लढतीत प्रीतीने कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोचा 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणार्या प्रीतीने पहिली फेरी सर्व पाच पंचांच्या 10-8 अशा गुणांसह जिंकली. जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असलेल्या प्रीतीने दुसर्या फेरीतही वर्चस्व कायम राखत भारतासाठी दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
त्यानंतर विद्यमान विश्वविजेती जैसमीन लांबोरियाने उत्तर आयर्लंडच्या गतविजेत्या मायकेला वॉल्शचा 5-0 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पहिली फेरी अत्यंत चुरशीची झाली असली तरी विभाजित निर्णय तिच्या बाजूने लागला. दुसर्या फेरीत जैसमीनने अचूक पंचांचा मारा करत सर्वसंमतीने विजय निश्चित केला. दिवसातील तिसर्या भारतीय अंतिम सामन्यात जादूमणी सिंगचा ऑस्ट्रेलियाच्या जाई डिक्सनकडून 0-5 असा पराभव झाला. उंच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या जादूमणीने शानदार पुनरागमन करत पहिली फेरी 3-2 अशी जिंकली. मात्र, डिक्सनने दुसर्या फेरीपासून सामन्यावर पकड मिळवत सर्व पंचांच्या एकमताने विजय नोंदवला आणि जादूमणीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताला दुहेरी यश
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताने दमदार कामगिरी करत दुहेरी यश मिळवले. सोमन राणाने सुवर्णपदक, तर शुभम जुयालने रौप्यपदकाची कमाई केली.सोमनने 13.40 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह सुवर्णपदक पटकावले. त्याचा पहिलाच प्रयत्न 13.38 मीटरचा होता आणि त्याच कामगिरीने तो आघाडीवर होता. त्यानंतर दुसर्या प्रयत्नात 13.40 मीटर अंतर गाठत त्याने अंतिम फेरीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शुभम जुयालने 13.28 मीटरच्या प्रयत्नासह रौप्यपदक जिंकले. त्याची सर्वोत्तम कामगिरी सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात झाली. सोमन राणाचे हे सुवर्णपदक ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे आठवे सुवर्णपदक ठरले.
Related
Articles
मद्यपान करुन परप्रांतीय तरूणांची भरधाव मोटारीतून स्टंटबाजी
13 Aug 2026
बुमरा सलग 21 महिन्यांपासून कसोटीत अव्वल
13 Aug 2026
महाराष्ट्रातील ८२ जणांना शौर्य आणि सेवा पदके
15 Aug 2026
30 टन मासळी, 700 टन चिकन, 2 हजार बोकडांची विक्री
13 Aug 2026
घोडेगाव-भीमाशंकर मुख्य रस्त्याची दुरवस्था
14 Aug 2026
राजकीय-सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यास मुदतवाढ
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा