E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नीरजला रौप्य; अखेरच्या प्रयत्नात यशवीरला कांस्य
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
ग्लासगो
: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिकूल हवामानात हंगामातील सर्वोत्तम 85.83 मीटर भालाफेक करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तर राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणार्या यशवीर सिंगने अखेरच्या सहाव्या प्रयत्नात 85.41 मीटरची भालाफेक करत कांस्यपदकावर नाव कोरले.टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या 28 वर्षीय नीरजने दुसर्या प्रयत्नात 85.83 मीटरची भालाफेक केली. हा त्याचा यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम प्रयत्न ठरला. यापूर्वी दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 85.69 मीटर फेक केली होती.
यशवीर पाच फेर्यांनंतर 81.33 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह सातव्या स्थानावर होता. मात्र, अखेरच्या प्रयत्नात त्याने 85.41 मीटरची भालाफेक करत थेट कांस्यपदक पटकावले. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागेने 89.75 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. अत्यंत थंड हवामान आणि जोरदार वार्यांमध्ये त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली.पाठीच्या दुखापतीतून पुनरागमन केलेल्या नीरजने स्पर्धेनंतर सांगितले की, माझी फिटनेस अजून पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. सातत्याने सुधारणा होत आहे. क्रीडा स्पर्धेपूर्वी डायमंड लीगमध्ये खेळणार असून त्यातून आणखी तयारी होईल. तो पुढे म्हणाला, हंगामातील कामगिरी केल्याचे समाधान आहे. येथे खूप थंडी असून मला उबदार हवामानात खेळणे अधिक सोयीचे वाटते.
ऑलिम्पिक विजेता अर्शद ठरला अपयशी
पाकिस्तानचा गतविजेता आणि विद्यमान ऑलिम्पिक विजेता अरशद नदीम 77.41 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह तीन फेर्यांनंतरच स्पर्धेबाहेर पडला, तर विश्वविजेता केशोर्न वॉलकॉट सहाव्या स्थानावर राहिला. काही काळ आघाडीवर असलेल्या नीरजला पथिरागेने दुसर्याच प्रयत्नात 89.75 मीटरची फेक करत मागे टाकले. विशेष म्हणजे, पथिरागेचे उर्वरित पाचही प्रयत्न फाऊल ठरले, तरी दुसर्या प्रयत्नातील कामगिरीमुळे त्याने सुवर्णपदक जिंकले.
Related
Articles
जुन्या प्रभाग 6 मधील साडेतेरा कोटींच्या कामांसाठी ’पुन्हा निविदा’ निघणार?
14 Aug 2026
अभिजीत दिपके पुन्हा विद्यार्थी आंदोलनात
17 Aug 2026
लष्करी श्वान ’टायसन’चा गौरव
17 Aug 2026
आंबोलीत सलग दुसर्या दिवशी पर्यटकाचा मृत्यू
13 Aug 2026
अकरावी प्रवेशाच्या अंतिम विशेष फेरीला सुरुवात
13 Aug 2026
कोलंबिया भूकंपातील बळींची संख्या २२५ वर
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा