E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेलला रौप्य; सेल्वा प्रभूला कांस्य
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
ग्लासगो
: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम असून पुरुष तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेत भारताने दुहेरी पदकाची कमाई केली. प्रवीण चित्रावेल याने 16.58 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह रौप्यपदक जिंकले, तर सेल्वा प्रभू याने 16.52 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेतील सुवर्णपदक जमैकाच्या जॉर्डन स्कॉट याने जिंकले. यापूर्वी पॅरा अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या टी54 1500 मीटर अंतिम शर्यतीत भारताचा रमेश शनमुगम याने 3 मिनिटे 23.59 सेकंद अशी वेळ नोंदवत सातवे स्थान मिळवले.
प्रवीणची सातत्यपूर्ण कामगिरी
प्रवीण चित्रावेलने संपूर्ण स्पर्धेत सातत्य राखले. त्याने पहिल्या प्रयत्नात 16.05 मीटर, दुसर्या प्रयत्नात 15.64 मीटर, तिसर्या प्रयत्नात 16.31 मीटर, तर चौथ्या प्रयत्नात 16.58 मीटरची सर्वोत्तम उडी मारत रौप्यपदक निश्चित केले. पाचव्या प्रयत्नात त्याने 16.40 मीटरची उडी घेतली, तर सहावा प्रयत्न फाउल ठरला.
सेल्वा प्रभूची दमदार पुनरागमन
21 वर्षीय सेल्वा प्रभूने पहिल्या प्रयत्नात 15.87 मीटरची उडी मारली. त्यानंतर दुसर्या प्रयत्नात 16.17 मीटर आणि तिसर्या प्रयत्नात 16.43 मीटर अशी सुधारणा केली. चौथा प्रयत्न फाउल ठरल्यानंतर त्याने पाचव्या प्रयत्नात 16.52 मीटरची उत्कृष्ट उडी मारून कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या प्रयत्नात त्याने 16.08 मीटरची उडी घेतली.
प्रवीणचा उल्लेखनीय प्रवास
2018 मध्ये खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि त्याच वर्षी युथ ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून प्रवीण चित्रावेलने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. त्यानंतर त्याने 2023 आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय इनडोअर विक्रम प्रस्थापित केला. पुढे 17.37 मीटरच्या उडीसह भारतीय राष्ट्रीय आउटडोअर विक्रम सुधारला आणि हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.
Related
Articles
शहरात आता नवीन ’स्मार्ट वाहनतळ’ धोरण
13 Aug 2026
मायदेशात विश्वचषक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याची मिलरची इच्छा
13 Aug 2026
वाचक लिहितात
13 Aug 2026
जलपर्णी वाहून गेल्यानंतर आता निविदांचा घाट
13 Aug 2026
क्षेत्र भीमाशंकरमध्ये हर हर महादेवचा जयघोष
18 Aug 2026
सिंहगडावर तरूणींशी असभ्य वर्तन;तोकडे कपडे घातल्याने मारहाण
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा