E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
तन्वी शर्माची अंतिम फेरीत धडक
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
उन्नती हुडाचा उपांत्य फेरीत पराभव
तैपेई ओपन स्पर्धा
तैपेई सिटी
: भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने शानदार कामगिरी करत तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तन्वीने यजमान चायनीज तैपेईच्या हुआंग यू सुन हिचा अवघ्या 33 मिनिटांत 21-17, 21-11 अशा सरळ गेममध्ये पराभव केला.
गतवर्षी यूएस ओपन सुपर 300 स्पर्धेत उपविजेती ठरलेली पंजाबची 17 वर्षीय तन्वी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळली. तिच्या वेगवान क्रॉस-कोर्ट स्मॅश आणि अचूक पुश शॉट्समुळे हुआंगला संपूर्ण सामन्यात बचावात्मक खेळ करावा लागला.भारताला महिला एकेरीत अखिल भारतीय अंतिम सामना पाहण्याची संधी होती. मात्र, दुसर्या उपांत्य फेरीत उन्नती हुडा हिला व्हिएतनामच्या जागतिक क्रमवारीत 21व्या क्रमांकावर असलेल्या थुई लिन्ह गुयेन हिच्याकडून 15-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला.त्यामुळे विश्व ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तन्वी आता रविवारी होणार्या अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित थुई लिन्ह गुयेन हिच्याशी विजेतेपदासाठी दोन हात करणार आहे.
तन्वी ही 2024 मधील बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या भारतीय संघाची सदस्य होती. गेल्या दोन वर्षांत तिच्या खेळात लक्षणीय प्रगती झाली आहे. तिने 2025 मध्ये ओडिशा मास्टर्स सुपर 100 आणि गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले, तर 2024 मध्ये बॉन इंटरनॅशनल आणि 2025 मध्ये डेन्मार्क चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.उपांत्य फेरीतील पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 3-3 अशी बरोबरी होती. त्यानंतर तन्वीने आघाडी घेत 14-10 आणि नंतर 17-11 अशी मजल मारली. हुआंगने 15-17 अशी आघाडी कमी केली, तरी तन्वीने आक्रमक खेळ कायम ठेवत पहिला गेम जिंकला.
Related
Articles
सोलापूर शहराबाहेरून तिसरी आणि चौथी नवीन रेल्वे लाईन उभारण्यास मंजुरी
18 Aug 2026
‘एफ-१’ व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळेना...
14 Aug 2026
पाकिस्तानी नागरिकाकडून नकाशा आणि छायाचित्रे जप्त
14 Aug 2026
अदानी यांच्यावरील गुन्हे रद्द; न्यूयॉर्क न्यायालयाचा निर्णय
12 Aug 2026
हॉटेलच्या आगीत आठ जणांचा मृत्यू
18 Aug 2026
‘सातबारा’वर नाव नसलेल्या शेतकर्यांना दिलासा
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा