E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प यांचे लष्करी अधिकार कायम
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
इराणवरील हल्ले रोखण्याचा प्रस्ताव संसदेने फेटाळला
वॉशिंग्टन
: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविषयक अधिकारांवर कायदेशीर मर्यादा आणण्यासाठी मांडण्यात आलेला विशेष प्रस्ताव गुरुवारी संसदेमध्ये 49 विरुद्ध 50 अशा निसरड्या मतांनी फेटाळला.पेनसिल्व्हेनियाच्या रिपब्लिकन पक्षाच्या खासदार डेव्ह मॅककॉर्मिक या मतदानापासून दूर राहिल्याने, अवघ्या एका मताच्या फरकाने हा प्रस्ताव मंजूर होता-होता राहिला. त्यामुळे ट्रम्प यांचे लष्करी निर्णय घेण्याचे अधिकार अबाधित राहिले आहेत.
या प्रस्तावानुसार, इराणविरुद्ध कोणतीही नवी लष्करी किंवा क्षेपणास्त्र कारवाई करण्यापूर्वी ट्रम्प यांना संसदेची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे करण्यात येणार होते. यामुळे अध्यक्षांना मनमानी पद्धतीने एकतर्फी लष्करी निर्णय घेण्यावर मोठा अंकुश बसला असता.मात्र, हा प्रस्ताव पराभूत झाल्यामुळे ट्रम्प प्रशासनाचे सध्याचे लष्करी अधिकार पूर्णपणे कायम राहिले असून, त्यांना कठीण प्रसंगी तातडीने पावले उचलण्याची मुभा मिळाली आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच इराणमधील प्रमुख अणुस्थळे आणि इतर सामरिक लक्ष्यांवर हवाई हल्ल्यांना मंजुरी दिली होती. संसदेला अंधारात ठेवून कोणत्याही देशाविरुद्ध थेट लष्करी कारवाई करणे अयोग्य असल्याचे सांगत विरोधी पक्षातील डेमोक्रॅट सदस्यांसह काही मोजक्या रिपब्लिकन सदस्यांनीही या कृतीचा तीव्र विरोध केला होता. याच दबावातून हा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला होता.चर्चेदरम्यान प्रस्तावाच्या समर्थकांनी, अमेरिकेच्या संविधानानुसार युद्ध पुकारण्याचा किंवा घोषित करण्याचा मूळ अधिकार संसदेकडे असल्याचे सांगत अध्यक्षांनी एकतर्फी निर्णय घेणे चुकीचे असल्याचे ठासून सांगितले. याउलट, विरोधकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर तातडीने आणि वेळेत निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांकडे व्यापक अधिकार असणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद केला.
Related
Articles
रशियाच्या आंतरराष्ट्रीय लवादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड मध्यस्थ
14 Aug 2026
नौदलाच्या जवानासह पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले
17 Aug 2026
राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
13 Aug 2026
देशापुढील आव्हाने आणि नव्या दिशा
15 Aug 2026
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
12 Aug 2026
चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे निधन
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा