E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हजारो नागरिकांची स्पेनमध्ये घुसखोरी; 18 जणांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
माद्रिद
: चांगल्या भविष्याच्या शोधात मोरोक्कोमधून हजारो बेकायदा स्थलांतरितांनी जमीन व समुद्रमार्गाने स्पेनच्या सेउटा शहरात जबरदस्तीने घुसखोरी केली आहे. या अभूतपूर्व घुसखोरीमुळे दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धजन्य आणि आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रक्तरंजित संघर्षात आणि गोंधळात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मोरोक्कोमधील हजारो नागरिकांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्यासाठी धोकादायक मार्ग अवलंबला आहे. अनेकांनी समुद्रमार्गे पोहून अंतर पार केले तर काहींनी सीमावर्ती कुंपण ओलांडून सेउटा शहरात प्रवेश केला. या घुसखोरांमध्ये केवळ तरुण आणि पुरुषच नव्हे, तर महिला आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्पॅनिश सरकारने सेउटा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सिव्हिल गार्डला मदत करण्यासाठी थेट सैन्य आणि अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.या गंभीर संकटाची दखल घेत स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि गृहमंत्री फर्नांडो ग्रांदे-मार्लास्का हे स्वतः परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सेउटा शहराचा दौरा करणार आहेत. सीमा सुरक्षा पूर्णपणे कोलमडल्यामुळे युरोपियन देशांमध्ये सुरक्षेची भीती निर्माण झाली आहे.
शेंगेन करार रद्द करण्याचा इशारा
या स्थलांतर संकटामुळे इतर युरोपियन देशही सतर्क झाले आहेत. इटलीची स्पेनसोबत थेट सीमा सामायिक होत नसली, तरी या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी स्पेनसोबतचा शेंगेन खुला सीमा करार रद्द केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी दिला आहे.
Related
Articles
मायदेशात विश्वचषक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याची मिलरची इच्छा
13 Aug 2026
‘एफ-१’ व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळेना...
14 Aug 2026
विचारांशी प्रामाणिक पत्रकारिताच समाजासाठी दीपस्तंभ : गडकरी
18 Aug 2026
’माझ्या फुटबॉल कारकीर्दीचे कदाचित हे शेवटचे वर्ष’
18 Aug 2026
अकोला-इंदूर चोरटा व्यापार
17 Aug 2026
अदानी प्रकल्पाविरोधात आदिवासींचे आंदोलन
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा