E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निरपराध वृक्षाला मध्यरात्रीच ’फाशी’!
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
वृक्षप्रेमी आक्रमक
येरवडा
: मोटार झाडाला धडकून अपघात होऊन यात दोन व्यक्ती जखमी झाल्या; पण या घटनेनंतर झाडच तोडण्यात आले. यामुळे वृक्ष संवर्धन समिती आणि पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत.शहादल बाबा दर्ग्याकडून संगमवाडीच्या दिशेने येणार्या एक भरधाव मोटार अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडर ओलांडून फुटपाथवरील एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात मोटारीमधील दोन जण जखमी झाले, तर मोटारीचे मोठे नुकसान झाले.
या अपघातानंतर फुटपाथवरील हे झाड एका बाजूला थोडे झुकले होते. वास्तविक पाहता, या झाडामुळे रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नव्हता. अपघातानंतर त्या झाडाला थोडासा आधार देऊन वाचवणे सहज शक्य होते. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने असंवेदनशीलता दाखवत अपघाताच्याच रात्री तातडीने कटर आणून ते झाड कापण्यात आले.पण मद्यधुंद किंवा बेजबाबदारपणे गाडी चालवणार्यांच्या चुकीची शिक्षा झाडाला भोगावी लागल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ’नागरिकांची वृक्ष संवर्धन समिती’चे सदस्य समीर उत्तमराव निकम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर तीव्र आक्षेप घेत, निकम यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष अधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. विनाकारण मध्यरात्री झाड तोडण्याचे आदेश देणारे अधिकारी आणि अपघात करणारे वाहनचालक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Related
Articles
बुमराच्या अनुपस्थितीत ब्रार भारताचा हुकमी एक्का
12 Aug 2026
एनटीएने ५० कर्मचार्यांना हटवले
18 Aug 2026
वाचक लिहितात
18 Aug 2026
देशापुढील आव्हाने आणि नव्या दिशा
15 Aug 2026
पालघरमध्ये स्फोटात कामगार जखमी
18 Aug 2026
शहरात 60 हजार कोटींची रस्ते विकासाची कामे हाती घेणार
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा