E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात वेगवेगळ्या अपघातात पाच जणांंचा मृत्यू
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
पुणे
: शहरात वेगवेगळ्या अपघातातंत पाच जणांचा मृत्यू झाला. बेदरकारपणा, वाहतूक नियमाचे उल्लंघन, नियमभंग अवजड वाहतूक केल्यामुळे अपघात घडले असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या वाढत्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले असून, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार रवींद्र अनंत जोशी (वय 80, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) हे ठार झाले आहेत रोहित जोशी (वय 53) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रवींद्र जोशी हे 16 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करत आहेत.
उत्तमनगर-खडकवासला रस्त्यावरील कुडजे गावाजवळ भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विवेक विनोद मोहरीर (वय 44) असे मृत्यमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी शीतल (वय 42, रा. गावकुस रिसोर्ट, जांभळी, सांगरुण, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार विवेक हे 29 जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे गावाकडे जाणार्या रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार विवेक यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक पालवे तपास करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला भागात नुकतीच घडली. मोहम्मद गुलजार सिद्दीकी (वय 47, रा. उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सिद्धीकी यांचे चुलतभाऊ सिंकदर शफी सिद्दीकी (वय 64) यांनी नांदंडे सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार मोहम्मद सिद्दीकी हे 24 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास खडकवासला परिसरातून निघाले होते. स्मशानाभूमीजवळील अरुंद रस्त्यावर समोरुन येणाार्या भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार मोहम्मद यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस फौजदार भापकर तपास करत आहेत.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नर्हे भागात घडली. सुमीत राजेश राठोड (वय 17, रा. अभिनव कॉलेजजवळ, नर्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राठोड याची आई अनुसया (वय 42) यांनी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार सुमीत हा 11 जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास नर्हे परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सुमीत याला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातास जबबादार ठरल्याप्रकरणी वाहनचालक, तसेच सुमीत अल्पवयीन असताना त्याला दुचाकी वापरास देणार्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरकुळे तपास करत आहेत.
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी चौकात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अनिल लक्ष्मण वाघमारे (वय 45, रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुशीला (वय 42) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिल वाघमारे हे 16 जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बोपोडी चौकातून निघाले होते. त्या वेळी अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अवजड वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गालफाडे तपास करत आहेत.
Related
Articles
ढोलताशा पथकांच्या मंडपांचे अतिक्रमण
10 Aug 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीची आत्महत्या
14 Aug 2026
दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी
15 Aug 2026
शहर अजूनही खड्ड्यातच पावसाळापूर्व कामाचे काय झाले?
11 Aug 2026
शहरातील स्वच्छतागृहांची सफाई करण्यात येणार
12 Aug 2026
एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन
11 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू