E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
‘मॉडेल स्कूल‘चा होणार विस्तार
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
300 शाळांचा नव्याने समावेश
पुणे
: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणार्या लोकनेते अजित पवार मॉडेल स्कूल उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या आणखी 300 शाळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण 526 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण धोरणाशी सुसंगत आहे. या उपक्रमासाठी 150 कोटी रुपयांचा निधी सीएसआर भागीदारीतून उभारण्यात आलेला आहे. या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद, उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवासी यांच्या सहभागातून ग्रामीण शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे.
या असणार सुविधा
< डिजिटल आणि स्मार्ट वर्गखोल्या
< कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स लॅब
< खगोलशास्त्र आणि स्किल लॅब
< आधुनिक ग्रंथालये आणि ई-लर्निंग सुविधा
< इंग्रजी भाषा विकासासाठी विशेष कार्यक्रम
< शिक्षकांसाठी क्षमता विकास व विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
< विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास उपक्रम
< ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपक्रम
लोकनेते अजितदादा पवार पुणे मॉडेल स्कूल हा ग्रामीण शिक्षणात परिवर्तन घडविणारा उपक्रम आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तंत्रज्ञानाधारित शिक्षण, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी या माध्यमातून होत आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. पालकांचा वाढता विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झालेली सुधारणा हे या उपक्रमाचे खरे यश आहे.
- वीरधवल जगदाळे, जिल्हा परिषद अध्यक्ष
Related
Articles
तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला केराची टोपली
14 Aug 2026
डॉ. प्रभा अत्रे संगीत साहित्य-संशोधन पुरस्कार जाहीर
18 Aug 2026
महाराष्ट्रातील ८२ जणांना शौर्य आणि सेवा पदके
15 Aug 2026
नेवेकरवाडीच्या विहिरीत मळीमिश्रित पाणी
17 Aug 2026
आंबोलीत सलग दुसर्या दिवशी पर्यटकाचा मृत्यू
13 Aug 2026
मद्यपान करुन परप्रांतीय तरूणांची भरधाव मोटारीतून स्टंटबाजी
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा