E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
लवप्रीतला वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
भारत पदकतालिकेत 10व्या स्थानावर
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा
ग्लासगो
: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली. वेटलिफ्टर लवप्रीत सिंग याने पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले, तर महिला थाळीफेक स्पर्धेत सीमा कालीरामन हिने कांस्यपदकाची कमाई केली. या दोन पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या 17 वर पोहोचली असून, त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 10व्या स्थानावर आहे.
अवघ्या एका किलोने हुकले सुवर्ण
लवप्रीतने एकूण 388 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. त्याने स्नॅचमध्ये 176 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 212 किलो वजन उचलले. विशेष म्हणजे, स्नॅच प्रकारात 176 किलो वजन उचलून त्याने राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, एकूण वजनात तो न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूज पेक्षा केवळ एका किलोने मागे राहिला आणि सुवर्णपदक हुकले. न्यूझीलंडच्या अँड्र्यूजने क्लीन अँड जर्कमध्ये गेम्स विक्रम नोंदवत एकूण 389 किलो (166 + 223) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंग्लंडच्या अँड्र्यू ग्रिफिथने 356 किलो (165 + 191) वजन उचलत कांस्यपदक पटकावले.
13व्या वर्षी वेटलिफ्टिंगची आवड
वयाच्या 13व्या वर्षी गावा तील काही युवकांना वेटलिफ्टिंगचा सराव करताना पाहून लवप्रीतला या खेळाची आवड निर्माण झाली. मर्यादित साधनसामग्रीत स्थानिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव सुरू केला. 2017 मध्ये त्याची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पतियाळा येथील राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आणि याच ठिकाणाहून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
सीमाला थाळी फेकीत कांस्य
महिला चक्का फेक स्पर्धेत भारताच्या सीमा हिने 58.65 मीटर अंतरावर थाळी फेकत कांस्यपदक जिंकले. तिने ही कामगिरी तिसर्याच प्रयत्नात नोंदवली. मात्र, तिच्या 59.73 मीटर या वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरीपर्यंत तिला पोहोचता आले नाही. भारताचीच निधी राणी हिने 57.10 मीटर अंतरासह चौथे स्थान मिळवले आणि पदकापासून थोडक्यात वंचित राहिली. तिची वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी 58.82 मीटर आहे. जमैकाच्या समंथा हॉल हिने पाचव्या प्रयत्नात 61.66 मीटर अंतर गाठत सुवर्णपदक जिंकले, तर कॅनडाच्या ज्युलिया टंक्स हिने 60.67 मीटर अंतरासह रौप्यपदक पटकावले.
Related
Articles
काकूंची दिनचर्या
14 Aug 2026
एन. चंद्रा यांचा टा टा...
17 Aug 2026
नक्षलवादी मानसिकतेचा अभिमान : केजरीवाल
18 Aug 2026
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा
13 Aug 2026
तरुणांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता
12 Aug 2026
अरोनियनसोबतचा सामना प्रज्ञानानंदने बरोबरीत सोडवला
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा