आगामी विश्‍वचषकासाठी मैदानांची घोषणा   

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात रंगणार स्पर्धा

जोहान्सबर्ग : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2027 च्या पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्‍वचषकासाठी यजमान मैदानांची अधिकृत घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांतील एकूण 12 स्टेडियमवर स्पर्धेतील सामने खेळवले जाणार असून, त्यापैकी आठ मैदाने दक्षिण आफ्रिकेत आहेत. 50 षटकांचा हा प्रतिष्ठेचा विश्‍वचषक तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा आफ्रिका खंडात परतत आहे. यापूर्वी 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांनी संयुक्तपणे विश्‍वचषकाचे आयोजन केले होते.
 
12 शहरांमध्ये सामन्यांचा थरार
 
जोहान्सबर्ग येथे आयोजित भव्य समारंभात दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरे, झिम्बाब्वेमधील तीन शहरे आणि नामिबियाची राजधानी विंडहोक यांना सह-यजमान असणार आहेत. या कार्यक्रमाला दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथ, मखाया एनटिनी, हाशिम अमला, विद्यमान कर्णधार तेम्बा बावुमा, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मासाकाड्झा आणि नामिबियाचा रुडोल्फ जान्सेन व्हान व्ह्युरेन उपस्थित होते.

Related Articles