इराणच्या हल्ल्यात चिनी कंपनीच्या इमारतीचे नुकसान   

कुवेत लष्कराची माहिती  

कैरो : इराणच्या हल्ल्यात एका चिनी कंपनीच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले, ज्यात एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, अशी माहिती कुवेतच्या लष्कराने दिली.कुवेत लष्कराने गुरुवारी सकाळी सांगितले की, या हल्ल्यात उत्तर कुवेतमधील इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी या घटनेबद्दल अधिक तपशील दिला नाही.जॉर्डनच्या हवाई संरक्षण प्रणालीने इराणकडून डागलेली पाच क्षेपणास्त्रे पाडल्यानंतर हा हल्ला झाला. जॉर्डनची सरकारी वृत्तसंस्था, पेट्राच्या मते, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
यापूर्वी, अमेरिकेच्या लष्कराने इराणवर मोठे हवाई हल्ले केल्याचे म्हटले होते. जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने केलेल्या पूर्वीच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एका समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या कारवाईदरम्यान, अमेरिकी सैन्याने इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या 12 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ला केला. यामध्ये लष्करी कमांड सेंटर्स, क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ, तसेच किनारी पाळत आणि संरक्षण स्थळांचा समावेश होता.

Related Articles