काझेरूनसह दहा शहरांवर अमेरिकेकडून हल्ले   

वॉशिंग्टन : अमेरिकेने गुरुवारी सकाळी इराणमधील 10 हून अधिक शहरांवर हवाई हल्ले केले. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केशम, किश, काझेरून, अहवाज, अबादान, शादेगान, अरवांदकेनार, बुशेहर, जाम आणि खोरमोझ या शहरांना अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आले.केशम बेटावरील एका निवासी इमारतीवर केलेल्या हल्ल्यात एक दाम्पत्य आणि त्यांचे 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर इतर दोन मुले जखमी झाली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अहवाल दिला की, त्यांनी इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. ज्यात कमांड सेंटर्स, क्षेपणास्त्र आणि ड्रोन सुविधा, किनारी निगराणी आणि संरक्षण तळ, तसेच सागरी लष्करी क्षमता यांचा समावेश आहे.या हल्ल्यांपूर्वी ट्रम्प यांनी सांगितले होते की, जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. ते म्हणाले, त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आता आमची पाळी आहे.

Related Articles