E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यात सात ठार
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
कीव
: रशियाने बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पूर्व युक्रेनपासून पश्चिम युक्रेनपर्यंत अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांनी हल्ले केले. यात सात जण ठार आणि अनेक जण जखमी झाले, असे अधिकार्यांनी सांगितले.अधिकार्यांच्या मते, पूर्वेकडील डनिप्रोपेत्रोव्स्क आणि पश्चिमेकडील लविव्ह प्रदेशात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. रशियाने गेल्या काही महिन्यांत युक्रेनियन शहरांवरील हल्ले तीव्र केले असून, आता असे हल्ले सारखेच होत आहेत.
डनिप्रोपेत्रोव्स्क प्रदेशाच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर हांझा यांनी सांगितले की, रशियन सैन्याच्या हल्ल्यात सहा जण ठार, 10 जण जखमी झाले आणि नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्ये मुलांचाही समावेश असल्याचे त्यांनी समाज माध्यमावर सांगितले. क्रिव्हि रिह प्रदेशात एक सहा वर्षांची मुलगी आणि 11 व 17 वर्षांच्या दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला. लविव्ह प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख मॅक्सिम कोझिट्स्की यांनी सांगितले की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 30 झाली असून, बचावकार्य सुरू आहे.
लविव्हचे महापौर अँड्री सॅडोवी यांनी सांगितले की, शहरावर गुरुवारी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला झाला. दोन निवासी इमारतींचे सर्वाधिक नुकसान झाले, तर 20 हून अधिक निवासी इमारती, एक शाळा आणि दोन बालवाड्यांचेही नुकसान झाले. जखमींमध्ये मुलांचाही समावेश असून, त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रशियन सैन्याने राजधानी कीवमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यात एका 31 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर दोघे जखमी झाले. राष्ट्रीय पोलिसांच्या प्रेस सेवेने ही माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात शहरातील निवासी इमारती, एक बाजारपेठ, एक गॅरेज कॉम्प्लेक्स, गोदामे आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले. कीव प्रदेशातील ब्रोवारी जिल्ह्यातही पाच जण जखमी झाले.
Related
Articles
करंजेच्या सोमेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
18 Aug 2026
शहरातील उड्डाणपूल, पाणीपुरवठा अन् ‘बी-2’चा प्रश्न मार्गी : महापौर कोंड्याल
18 Aug 2026
अमेरिकन टॅरिफ युद्धाचा भारताला लाभ
13 Aug 2026
जेएसएससी कार्यालयात सीआयडीचे छापे
18 Aug 2026
यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांचे ४३ कोटींचे वेतन व देणी थकीत
13 Aug 2026
राहुल आणि सोनिया गांधींविरोधात तक्रार
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा