E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बांकीपूरमध्ये 34 टक्के मतदान
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
पाटणा
: बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरूवारी सरासरी 34 टक्के मतदान झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सोमवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीत 30 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रत्यक्ष लढत ’जन सुराज’चे संस्थापक प्रशांत किशोर आणि भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्यात आहे. नितीन नबीन यांनी बांकीपूरचे पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. ते राज्यसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिकामी झाली. भाजपने अभिषेक कुमार यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अभिषेक यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे भाजपने नीरज यांना उमेदवारी दिली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
काल सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली. पहिल्या सहा तासांत केवळ 20.01 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आपल्या समर्थकांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप केला. आतापर्यंत 16 हून अधिक जन सुराज कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप खासदार रविशंकर प्रसाद, भाजपचे ज्येष्ठ नेते सी. पी. ठाकूर, त्यांचे पुत्र आणि नवादाचे खासदार विवेक ठाकूर आदींनी मतदानाचा हक्क बजावला.
Related
Articles
मुख्याध्यापकासह अधीक्षक आणि अधीक्षिकेविरुद्ध गुन्हा
13 Aug 2026
दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी
15 Aug 2026
आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर
18 Aug 2026
चंदूकाका सराफ यांची फसवणूक; तोतयाला चंद्रपूरमधून अटक
13 Aug 2026
राज्यसेवेतील अधिकारी-कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करा
12 Aug 2026
कुर्डुवाडीतील माढा रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा