शेतकरी कर्जमाफीसाठी 7 हजार कोटींच्या वितरणाला मान्यता   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ साठी सात हजार कोटींची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहकार विभागाने गुरूवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्ज थकबाकीची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी  शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेत आतापर्यंत 16 लाख 96 हजार पात्र शेतकर्‍यांची यादी जाहीर झाली आहे. येत्या 10 ऑगस्ट रोजी  शेतकर्‍यांची दुसरी यादी अपेक्षित  आहे. एकूण 56 लाख लाभार्थी शेतकर्‍यांपैकी 32 लाख शेतकरंना कर्जमाफी तर 24 लाख शेतकरंना प्रोत्साहनपर लाभ दिले जाणार आहेत.राज्य सरकारने 56 लाख शेतकर्‍यांसाठी 36 हजार 585 कोटींची कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.  नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात  या योजनेसाठी पुरवणी  मागणीत 20 हजार 552 कोटींची तरतूद केली होती. या निधीतून 7 हजार कोटींचा निधी वितरित करण्यास सहकार विभागाने काल मान्यता दिली.

Related Articles