E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मतदारांनी पुढाकार घेतल्यास एसआयआर प्रक्रिया होणार गतिमान
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मिळाला अतिरिक्त वेळ
अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी होणार प्रसिद्ध
पुणे
: मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील अचूक असणे ही केवळ निवडणूक प्रक्रियेची गरज नसून प्रत्येक नागरिकाच्या लोकशाहीतील सहभागाची जबाबदारी आहे. राज्यातील काही भागांतील अतिवृष्टीमुळे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना स्वतःहून पुढाकार घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या गृहभेटी आता 8 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे ज्यांच्या मतदारयादीतील पत्त्याची माहिती अपुरी, चुकीची किंवा संक्षिप्त स्वरूपात आहे, अशा नागरिकांना आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे.दरम्यान, नागरिकांना त्यांच्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी आपल्या नावाची आणि पत्त्याची पडताळणी करून आवश्यक त्या सुधारणा तातडीने पूर्ण कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या तारखा लक्षात ठेवा
सुधारित कार्यक्रमानुसार मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त अर्जांवरील सुनावणी आणि निर्णय प्रक्रिया 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हाधिकार्यांचे नागरिकांना आवाहन
अनेक मतदारांच्या पत्त्यांमध्ये केवळ परिसराचे नाव किंवा अपुरी माहिती नोंदविण्यात आल्याने संबंधित मतदारांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्च करावा लागतो. जसे की पत्त्यात केवळ कोथरूड, पुणे किंवा अमुक व्यक्ती, पुणे अशी नोंद असल्यास पडताळणी प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरते. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःहून बीएलओ यांच्याशी संपर्क साधून नोंदणी अर्ज भरावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
Related
Articles
महाराष्ट्रातील ८२ जणांना शौर्य आणि सेवा पदके
15 Aug 2026
मायदेशात विश्वचषक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याची मिलरची इच्छा
13 Aug 2026
ऐतिहासिक ध्वज आणि मादाम कामांचा स्वातंत्र्य संदेश
18 Aug 2026
बांगलादेशाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ 198 धावांत गारद
14 Aug 2026
परदेशी निधी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे
13 Aug 2026
प्रज्वल रेवण्णा याच्याकडे तुरुंगात आक्षेपार्ह चित्रफिती
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा