E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हा तर युवा पिढीने केलेला सन्मान
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
शैला मुकुंद यांची भावना
पुणे
: आपण आतापर्यंत केलेल्या कामाची दखल युवा पिढीने घेतली आहे. आपल्याला मिळालेला सन्मान हा त्याचीच पावती असल्याची भावना प्रसिद्ध निवेदिका, लेखिका शैला मुकुंद यांनी व्यक्त केली. सृजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ज्योस्त्ना भोळे स्वरोत्सवात शैला मुकुंद यांना प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ गायक शौनक अभिषेकी, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. बाळकृष्ण परांजपे, वंदना खांडेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष अधिश पायगुडे, उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश धोका यांच्या चंद्रप्रकाश फाउंडेशनतर्फे चिन्मय कुलकर्णी (गायक) आणि गायक प्रकाश माळी (तबलावादक) यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
प्रकाश पायगुडे यांच्याबरोबर आपण भरपूर काम केले. मुलाखत घेताना सहजसंवाद साधण्याची उत्तम कला प्रकाश यांच्याकडे होती. उत्तम संघटक, संयोजक, सुस्वभावी हे गुण त्यांच्या स्वभावात होते. आपल्याला हा पुरस्कार ज्योस्त्ना भोळे यांच्या नावाने होत असणार्या महोत्सवात मिळत असल्याचे आपल्याला अप्रूप असल्याचे शैला मुकुंद यांनी सांगितले. उल्हास पवार म्हणाले, प्रकाश पायगुडे आणि आपला पाच दशकांचा संबंध राहिला. क्रीडा वार्ताहर, उत्तम समालोचक म्हणून त्याची ख्याती होती. आजच्या काळात थोडे काम केले की अधिक केले असे दाखवण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. शैला मुकुंद यांनी आतापर्यंत खूप काम केले. मात्र, त्याचा कधीच देखावा केला नाही. तरुण पिढीला त्याची प्रेरणा अधिक भावली आहे. अधिश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचलन केले.
Related
Articles
नक्षलवादी मानसिकतेवर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण द्यावे : सुप्रिया सुळे
18 Aug 2026
शिरूर बाह्यवळण जवळील रस्ता बनला धोकादायक
14 Aug 2026
बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूची विजयी सुरुवात
18 Aug 2026
राज्यात १८३ ठिकाणी एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण
18 Aug 2026
30 टन मासळी, 700 टन चिकन, 2 हजार बोकडांची विक्री
13 Aug 2026
श्रावण : परंपरेच्याआड दडलेले आरोग्याचे शहाणपण
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा