E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दुग्ध व्यवसायाला मिळणार बळ!
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
पशुपालकांना विविध साहित्यावर अनुदान
पुणे
: जिल्ह्यातील पशुपालकांसाठी जिल्हा परिषदेमार्फत 75 टक्के अनुदानावर उपयुक्त साहित्य पुरवठा करण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे. मुक्तसंचार गोठा, मिल्किंग मशीन, मूरघास युनिट, रबर मॅट आणि कडबाकुट्टी मशीन यांसारख्या आधुनिक साधनसामग्रीसाठी या योजनेतून कमाल 22 हजार 500 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. या योजने अंतर्गत 444 पशुपालकांना लाभ घेता येणार आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या 11 लाख 44 हजार 893 इतके गाई आणि म्हशींचे पशुधन आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाची मोठी भूमिका आहे. मात्र अनेक लहान आणि मध्यम पशुपालकांकडे आधुनिक साधनांची कमतरता असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषद निधीतून ही योजना राबविण्यात येणार असून, यासाठी 1 कोटींच्या निधीला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
मुक्तसंचार गोठ्यासाठी किमान 2 हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये तारेचे कुंपण, लोखंडी किंवा सिमेंटचे खांब तसेच खाद्य आणि पाण्याची योग्य व्यवस्था आवश्यक असेल. मिल्किंग मशीनसाठी आयएसआय मानांकन असणे बंधनकारक राहील. मूरघास युनिटसाठी 500 किलो क्षमतेच्या 30 किंवा 1,000 किलो क्षमतेच्या 15 सायलेज बॅग खरेदी कराव्या लागतील. रबर मॅटसाठी चार फूट बाय सहा फूट आकाराच्या किमान 10 मॅटची अट ठेवण्यात आली आहे. कडबाकुट्टी मशीन नामांकित कंपनीची आणि किमान तीन वर्षांची वॉरंटी असलेली असावी, अशी अट आहे.
ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम, सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद
या साहित्यांवर अनुदान
या योजनेअंतर्गत पशुपालकांना त्यांच्या गरजेनुसार एकाच घटकाचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये मुक्तसंचार गोठा तयार करणे, आयएसआय मानांकन असलेली सिंगल बकेट मिल्किंग मशीन खरेदी करणे, 15 मेट्रिक टन क्षमतेचे मूरघास युनिट उभारणे, रबर मॅट खरेदी करणे किंवा आयएसआय मानांकन असलेली कडबाकुट्टी मशीन खरेदी करणे यांचा समावेश आहे. प्रत्येक घटकाची प्रकल्प किंमत 30 हजार निश्चित करण्यात आली असून त्यावर 75 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 22 हजार 500 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागणार आहे.
Related
Articles
सोलापूर शहराबाहेरून तिसरी आणि चौथी नवीन रेल्वे लाईन उभारण्यास मंजुरी
18 Aug 2026
मद्यपान करुन परप्रांतीय तरूणांची भरधाव मोटारीतून स्टंटबाजी
13 Aug 2026
दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथांचे होणार डिजिटल जतन
13 Aug 2026
इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच निकामी
13 Aug 2026
नौदलाच्या जवानासह पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले
17 Aug 2026
जखमी विद्यार्थ्यांची सीईओंनी घेतली भेट
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा