E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बनावट पदवी प्रकरणात पुणे विद्यापीठाच्या कर्मचार्याला अटक
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
पुणे
: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने बनावट बी. कॉम पदवी, गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून 70 हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून विद्यापीठातील कर्मचार्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी गुरूवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 4 ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रमेश दामोदर मुखेकर (वय-48) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. मुखेकर हा विद्यापीठातील वित्त व लेखा विभागाच्या परीक्षा विभागात कार्यरत आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठण्यात फिर्याद दिली. मुखेकर याने विद्यापीठातील साहिल महेश कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बी.कॉमचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून 70 हजार ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले. व्हॉटस्अॅपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रासारख्या भासणार्या कॉपी दिल्या. अशी तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली होती.
ही कागदपत्रे परिक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नसल्याचे निर्देशनास आले. मुखेकरने पैसे स्वीकारून गैरकृत्य केल्याचे दिसून आल्याने त्याला विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफूल्ल पवार यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाकडून जारी करण्यात येणार्या परीक्षेच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षामानकांचा समावेश असल्यामुळे यासंदर्भातील अफवांवर विद्यार्थी आणि पालकंनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून आरोपी मुखेकरने विद्यापीठाशी संबंधित आणखी काही विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलिस करीत आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
15 Aug 2026
शिवणे-नांदेड सिटी पुलाचे काम तातडीने सुरू करा
17 Aug 2026
तरुणाच्या पाठीवर बसून नवरदेवाची वरात
18 Aug 2026
प्रभाग समित्यांना 25 लाखांपर्यंत निविदा मंजुरीचे अधिकार
17 Aug 2026
भीमाशंकरमध्ये भाविकांचा सागर
17 Aug 2026
देणगी चोरीचा तपास झटपट करा
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा