E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वारकरी महावीर कुस्ती स्पर्धेत मावळचा दबदबा; दीपक दाभाडे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
वडगाव मावळ
: आषाढी वारीनिमित्त कुस्तीगीर वारकर्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री समर्थ विष्णूदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा-2026’ मध्ये मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाजाचे वारकरी दीपक चंद्रकांत दाभाडे (रा. कोटेश्वरवाडी) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत 45 ते 55 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्याला चितपट करत त्यांनी ‘वारकरी महावीर’ स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती आणि माईर्स एमआयटी विश्व शांती केंद्र, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणार्या वारकरी कुस्तीगीरांसाठी गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा पंढरपूर आषाढी वारीदरम्यान वाखरी येथील विश्वशांती गुरुकुलात झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील वारकरी मल्लांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे मुख्य समन्वयक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलास कथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली. यावेळी महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम,विष्णू जोशिलकर, रावसाहेब मगर, महेश वरुटे, राहुल बिराजदार आणि हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला सन्मानचिन्ह, तलवार, मानाचा फेटा आणि सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. दीपक दाभाडे यांच्या या यशानंतर पंढरपूर येथील श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाजाच्या धर्मशाळेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.श्री विठ्ठल -रखुमाई संत तुकाराम भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, माजी पंचायत समिती सभापती निवृत्ती शेटे, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, जगन्नाथ नाटक पाटील, पंडित मोकाशी, चंद्रकांत दाभाडे, माणिक भसे, भरत मांडेकर, शिवाजी पवार, माणिक गाडे, विराज टोंगळे, सुनील येवले आणि दीपक राऊत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मावळातील वारकर्यांसाठी दीपक दाभाडे यांचे हे यश प्रेरणादायी ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
Related
Articles
वैयक्तिक कर्जांच्या थकबाकीमुळे कंपन्यांच्या चिंतेत वाढ
14 Aug 2026
चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नावर रविवारी बैठक
14 Aug 2026
खनिज तेलाचे दर वाढले
11 Aug 2026
महापौर निवासाचे ‘रामदूत’ नामकरण वादात
12 Aug 2026
बंद पडलेल्या कंपन्यांपैकी ७८ टक्के कंपन्यांचे अस्तित्व कागदावरच होते !
14 Aug 2026
पीएमआरडीएची १३४ अनधिकृत फलकांवर कारवाई
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू