E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
घरफोड्यांसाठी वाहनचोरी करणार्या सराईत टोळीचा पर्दाफाश
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
दोन आरोपी अटकेत, पाच गुन्ह्यांची उकल
पिंपरी
: चिखली परिसरात वाहनचोरी करून त्याच वाहनांचा वापर घरफोड्यांसाठी करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा चिखली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत वाहनचोरीचे पाच आणि घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे 2 लाख 95 हजार किमतीच्या चार दुचाकी आणि एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडलेल्या वाहनचोरीच्या घटनेनंतर पोलीस तपास पथकाने व्यापक तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण आणि त्यांच्या पथकाने परिसरातील 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तपासातून राज ऊर्फ ढेक्या बापडेकर हा आपल्या साथीदारांसह वाहनचोरी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राज संतोष बापडेकर (23, रा. शिवपार्वती हौसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली), शंकरसिंग समंदरसिंग टाक (18, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) यांना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी वाहनचोरीचे पाच आणि घरफोडीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. आरोपींकडून बुलेट, स्प्लेंडर, होंडा शाईन, सुझुकी अॅक्सेस या चार दुचाकींसह एक रिक्षा हस्तगत करण्यात आली. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 2 लाख 95 हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान अटक आरोपी राज संतोष बापडेकर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी वाहनचोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी शंकरसिंग समंदरसिंग टाक याच्याविरुद्ध हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये चार गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह किरण काटकर, विनोद व्होनमाने, प्रविण भोमाळे, सुरज सुतार, अरुण सावळे, भरत माने, संतोष भालेराव, अजय गायकवाड, कंठय्या स्वामी, रोहित मोरे, पोलीस शिपाई अनिल राखे आणि संतोष भोर यांनी सहभाग घेतला.
Related
Articles
वादळी अधिवेशनाची सांगता चर्चेविना अनेक विधेयके मंजूर
14 Aug 2026
देणगी चोरीचा तपास झटपट करा
18 Aug 2026
शिवणे-नांदेड सिटी पुलाचे काम तातडीने सुरू करा
17 Aug 2026
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहावे पदक मिळविण्याचे सिंधूचे लक्ष्य
17 Aug 2026
भारत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार
13 Aug 2026
राजस्तान, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडची विजयी सलामी
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा