फेडरल बँकेच्या खात्यातून 19 लाख 48 हजारांची फसवणूक   

पिंपरी : फेडरल बँकेच्या खात्याचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी देशातील चार नागरिकांची 19 लाख 48 हजार 667 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 19 मे 2025 रोजी फेडरल बँक, बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोन बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही खातेदार फेडरल बँकेच्या बिजलीनगर, चिंचवड या एकाच शाखेतील आहेत.पहिल्या प्रकरणात सोनू रामधनी वर्मा (ताथवडे, पुणे) या खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फेडरल बँकेत खाते उघडून आपल्या साथीदारांशी संगनमत केले. 
 
एका ग्रुपचा सभासद म्हणून स्वतःच्या खात्याचा वापर करून फसवणुकीचे आर्थिक व्यवहार केले. या खात्याद्वारे देशातील दोन नागरिकांची 18 लाख 63 हजार 667 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडली. दुसर्‍या प्रकरणात राहुल दिलीप ससाने (खराडी रोड, पुणे) या खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फेडरल बँकेत खाते उघडून आपल्या साथीदारांशी संगनमत केले. स्वतःच्या खात्यावरून सायबर फसवणुकीचे व्यवहार केले. या खात्याद्वारे भारतातील दोन नागरिकांची एकूण 85 हजारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
 
बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेधारकावर गुन्हा
 
बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा वापर करून फसवणुकीचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, आकुर्डी शाखा येथे घडली. सौरभ मधुकर जवरे (बिजलीनगर, चिंचवड) आणि त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खात्यावर 1 लाख 70 हजार 752 रुपयांचे संशयित आर्थिक व्यवहार झाले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles