E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
झाडणकामाच्या प्रकल्पावर सभागृहात प्रश्नांचा भडिमार
Wrutuja pandharpure
30 Jul 2026
अतिरिक्त मनुष्यबळाबाबत नगरसेवक साशंक; अस्वच्छता आढळल्यास ठेकेदारांवर कारवाईचा इशारा
पुणे
: शहरातील झाडणकामासाठी राबविण्यात येणार्या पथदर्शी प्रकल्पावर बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेमुळे ठेकेदारांचाच फायदा होणार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर स्पष्टीकरण देताना अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी, शहरात कुठेही अस्वच्छता आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
प्रशासनाने सांगितले की, 20 15 च्या लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे झाडणकामासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्यानंतर 34 गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने क्षेत्रफळात मोठी वाढ झाली. गुगल मॅपिंगद्वारे प्रत्येक प्रभागातील रस्ते आणि पदपथांची पडताळणी करून सुमारे 6,500 किलोमीटर रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान मनुष्यबळाइतकेच अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर नेमण्यात येणार आहेत.
चर्चेदरम्यान भाजपचे हरिदास चरवड यांनी ठेकेदारांवर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्याची बाब उपस्थित केली. वृषाली रिठे यांनी नोकरीसाठी 50 हजारांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप केला. पुनीत जोशी यांनी स्वच्छतेची गुणवत्ता कशी मोजली जाणार, असा प्रश्न विचारला. पृथ्वीराज सुतार यांनी पुनर्निविदेची मागणी केली, तर पायल तुपे यांनी या प्रक्रियेमुळे महापालिकेवर आर्थिक भार पडेल, असे मत व्यक्त केले.अनिल सातव, धनश्री कोल्हे, गफूर पठाण, काका चव्हाण, चंदूशेठ कदम आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही ठेकेदारांवरील नियंत्रण, कर्मचार्यांची उपस्थिती, भरतीतील गैरव्यवहार आणि मनुष्यबळाच्या फेरआढाव्याबाबत प्रशासनाला धारेवर धरले.
Related
Articles
परदेशी निधी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे
13 Aug 2026
शिराळ्यात नागपंचमी उत्साहात
18 Aug 2026
क्लोजिंग ऑक्शन सेशनमुळे इंडेक्स फंड्ससमोर नवे गणित
17 Aug 2026
घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद
17 Aug 2026
इम्रान खान यांच्या मृत्यूचा दावा खोटा
13 Aug 2026
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा