जन्म-मृत्यू दाखल्यांच्या विलंबावर संताप   

सीआरएस प्रणालीतील बदलांमुळे अर्ज रखडल्याची प्रशासनाची कबुली

पुणे : जन्म-मृत्यू दाखले आणि त्यातील दुरुस्तीची प्रकरणे महिनोनमहिने प्रलंबित राहत असल्याने महापालिकेच्या सभागृहात बुधवारी जोरदार गदारोळ झाला. नगरसेवकांनी नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करत प्रशासनाला जाब विचारला. आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी, सीआरएस प्रणाली लागू झाल्यानंतर जुन्या नोंदींचे डिजिटल रूपांतर आणि नवीन नियमांमुळे काही अर्ज प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. मोठ्या दुरुस्त्यांसाठी वरिष्ठ स्तरावरील मंजुरी आवश्यक असल्याने विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने मृत्यूचे दाखले न मिळाल्याने पेन्शन, विद्यार्थ्यांचे प्रवेश, पासपोर्ट आदी कामे अडकत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नियमांच्या चौकटीत नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. नगरसेवकांनी पूर्वीप्रमाणे नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांमध्ये नगरसेवकांच्या शिफारसपत्राला मान्यता देण्याचीही मागणी केली.

Related Articles