E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कास पठारावर तपासाच्या नावाखाली पर्यटन
Wrutuja pandharpure
30 Jul 2026
महिला पोलिस निरीक्षकांसह तिघांची वेतनवाढ रोखली
पुणे
: गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली सातार्यात जाऊन कर्तव्यात हलगर्जीपणा करत पर्यटन केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिस दलातील एका महिला पोलिस उपनिरीक्षकांसह तिघांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलिस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलिस शिपाई कोमल कांबळे यांची दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी सुनावली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी 4 एप्रिल 2026 रोजी नाईकवाडे या हवालदार पाटील, शिपाई कांबळे यांनी फिर्यादीसोबत सातारा येथे गेल्या होत्या. मात्र, तपास करण्याऐवजी केवळ मोघम स्वरूपाचा तपास करून उर्वरित वेळ पर्यटनासाठी खर्च केल्याचे विभागीय चौकशीत निष्पन्न झाले.
चौकशीनुसार, सातार्यात पोहोचल्यानंतर तिघांनी सर्वप्रथम स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने तपास करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता त्यांनी कणसे नावाच्या ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजेरी लावून घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळावरील व्यक्ती आणि परिसरातील कुठल्याही नागरिकांकडे कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे आढळून आले. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात अहवाल देऊन पुण्याकडे परतणे अपेक्षित असताना तिघेही सातार्याजवळील कास पठार तसेच अन्य प्रेक्षणीय स्थळांवर फिरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, फिर्यादी महिलेने तिची आई आजारी असून ती घरी एकटी असल्यामुळे लवकर पुण्यात परतण्याची विनंती केली होती. मात्र, त्या विनंतीकडेही दुर्लक्ष करून तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुण्यात मध्यरात्री सुमारे एक वाजता परतल्यानंतरही तिघांनी महिला फिर्यादीच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नाही. सुरुवातीला तिला स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीने विनंती केल्यानंतर तिला शनिवार पेठ पोलिस चौकीत सोडण्यात आले. महिला फिर्यादीला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचविणे अपेक्षित असताना तसे न केल्याने कर्तव्यात कसूर झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात हवालदार श्रीहरी पाटील यांच्यावरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. कोणतेही अधिकृत कारण नसताना आणि बेकायदेशीरपणे 3 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता त्यांनी फिर्यादीच्या घरी भेट दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. संपूर्ण प्रकरणाचा विभागीय चौकशी अहवाल विचारात घेतल्यानंतर नाईकवाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी कर्तव्यात बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केला असून त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली, असा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार तिघांनाही वेतनवाढ न करण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
Related
Articles
आक्रसणारा ’पांढरपेशा’ (अग्रलेख)
10 Aug 2026
संत साहित्यातून प्रयत्नवादाचा उपदेश
12 Aug 2026
पुढील २० वर्षांत भारत अंतराळ महासत्ता बनणार : मॉरिसन
15 Aug 2026
मेघवालला उंच उडीत रौप्यपदक
10 Aug 2026
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपींना दर्शनासाठी बंदी
11 Aug 2026
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू