E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाघोलीत वीज तारांमध्ये शॉर्टसर्किट
Wrutuja pandharpure
30 Jul 2026
खेळणारी लहान मुले थोडक्यात बचावली
वाघोली
: पुणे-अहमदनगर महामार्गाला जोडणार्या वाघोली येथील केसनंद रस्त्यावरील छत्रपती नगर परिसरात महावितरणच्या अतिशय बेजबाबदार आणि निष्काळजी कारभारामुळे स्थानिक नागरिकांच्या जिवाला घोर धोका निर्माण झाला आहे. छत्रपतीनगर कमान आणि ’ऑक्सी अल्टीमा’ सोसायटीच्या शेजारील मुख्य वीज वाहिन्यांवर दररोज भयानक शॉर्टसर्किट होत असून, या ठिकाणी एक थरारक प्रसंग घडला. वीज वाहिन्यांमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन ठिणग्या उडू लागल्याने, तिथे जवळच खेळत असलेली लहान मुले भयभीत होऊन पटापट घराच्या दिशेने पळाली. सुदैवाने मुलांनी प्रसंगावधान राखल्याने बुधवारी एक अतिशय मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, दररोज घडणार्या या घटनांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
वायरमनची तात्पुरती मलमपट्टी नागरिक त्रस्तस्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात विजेचा दाब कमी-जास्त होणे आणि वायर्समध्ये शॉर्टसर्किट होणे ही रोजचीच बाब झाली आहे.परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा मोठा बिघाड झाल्यावर नागरिक महावितरणकडे तक्रार करतात. त्यानंतर स्थानिक वायरमन येतात, जोडण्या करून तात्पुरती दुरुस्ती करतात आणि निघून जातात. मात्र, वीज प्रवाह पूर्ववत होताच अवघ्या काही तासांत पुन्हा तोच प्रकार सुरू होतो. महावितरणचे अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसून, ते एखाद्या मोठ्या रक्ताच्या अनर्थाची किंवा जीवितहानीची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.भावी आमदार, लोकप्रतिनिधी फक्त बॅनरवरच आहेत. सामान्य नागरिक वार्यावर सोडल्याचे दिसत आहे. एकीकडे नागरिक रोज मृत्यूच्या छायेत जगत असताना, दुसरीकडे मात्र राजकीय अनास्था उघड झाली आहे.
Related
Articles
किरकोळ महागाईत वाढ
13 Aug 2026
महापालिकेचे आता नवीन बोध चिन्ह
13 Aug 2026
महापौर निवासाचे ‘रामदूत’ नामकरण वादात
12 Aug 2026
चमोलीतील बोगदा दुर्घटनेत ७ कामगारांचा मृत्यू
15 Aug 2026
कुर्डुवाडीतील माढा रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
12 Aug 2026
श्रावण : परंपरेच्याआड दडलेले आरोग्याचे शहाणपण
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू