भाजपचे घर चलो अभियान   

शंकर जगताप यांनी घेतल्या घरोघरी नागरिकांच्या भेटी

 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून शहरात घर चलो अभियान राबविण्यात येत  आहे. या अभियानांतर्गत भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांच्याकडील सोपविलेले बूथ क्रमांक 109, 110 आणि 111 वरील नागरिकांशी संवाद साधला. 
 
दोन सत्रांमध्ये बिजलीनगर, शिवनगरी, गिरिराज या भागातील 70 घरांमध्ये जाऊन मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. सकाळी 9 वाजता बूथ प्रमुख-विवेक चिटणीस यांच्या घरी, पहिल्या सत्रात या भागातील 70 घरांमध्ये जाऊन नागरिकांसोबत संवाद साधून मोदी सरकारचा दहा वर्षातील विकास, विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनविण्याच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले. भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेविका मोना कुलकर्णी, माजी सत्तारुढ पक्षनेते शाम वाल्हेकर, बाजीराव चिंचवडे,   सचिन गोसावी, अनिकेत दळवी, महेश घुले, महेश कलाल, मुरलीधर चोपडे, जयवंत भोसले आदी उपस्थित होते.
 
जगताप म्हणाले की, देशात सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात देशाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करून आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. त्याचप्रमाणे देशातील भाजपशासित राज्यांनीही मोठा विकास केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्र व राज्य सरकारांची हीच विकासाची गाथा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी दि. 4 ते 11 फेब्रुवारी या काळात घर चलो अभियान राबविण्यात येत आहे.घर चलो अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी दोन सत्रात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला, असे  जगताप यांनी सांगितले.
 

Related Articles