E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
क्रीडा
भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला उपांत्य सामना
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
अंडर-19 विश्वचषक
बेनोनी, (दक्षिण आफ्रिका) : उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघाचा आज (मंगळवारी) यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयसीसी अंडर-19 विश्वचषकाचा उपांत्य फेरीत सामना होणार आहे. हा सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक मारत विजयाचा प्रबळ दावेदार होण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.
गतविजेत्या भारताने स्पर्धेतील सलग पाच विजयांच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. भारतीय संघ कोणत्याही विशिष्ट खेळाडूवर अवलंबून राहिला नसून सर्व खेळाडूंनी गरजेनुसार योगदान दिले आहे. फलंदाज धावा करण्यात यशस्वी ठरले, तर प्रतिस्पर्धी संघांना झटपट बाद करण्यात गोलंदाजांना यश आले आहे. भारतीय संघाने चांगल्या फरकाने सामन्यांमध्ये विजय मिळावला आहे. दोन शतके आणि एक अर्धशतकांसह, 18 वर्षीय मुशीर खान सध्याच्या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 83.50 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार उदय सहारन देखील चांगल्या लयीत असून त्याने 61.60 च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 304 धावा केल्या आहेत. स्वामी कुमार पांडेच्या अचूक गोलंदाजीचा सामना करणे सर्वच प्रतिस्पर्धी संघांना कठीण गेले आहे. त्याने 2.17 च्या इकॉनॉमी रेटने 16 बळी घेतले आहेत.
Related
Articles
महाकुंभमेळ्यात भाविकांना मिळणार नऊ रुपयांत जेवण
11 Jan 2025
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांना धक्काबुक्की
08 Jan 2025
नायडू रूग्णालयात ३५० खाटा राखीव
07 Jan 2025
भाचीच्या लग्नसोहळ्यात मामाने कालविले विष
09 Jan 2025
देशात लवकरच बुलेट ट्रेन धावणार : मोदी
07 Jan 2025
चॅम्पियन्स चषकासाठी महमद शमीला मिळणार संधी?
12 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)