E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अंतिम सामन्यासाठी ‘सूर्यकिरणची‘प्रात्यक्षिके
Samruddhi Dhayagude
18 Nov 2023
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रणांगणात हे दोन संघ भिडणार आहे. सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणारा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सामन्याआधी खास वायुसेनेच्या हवाई प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. भारतीय वायुसेनाची ‘सूर्यकिरण‘ नावाची टीम हवाई प्रात्यक्षिके करणार आहे. जवळपास दहा मिनिटांपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मैदानामध्ये असणार्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच असेल. या हवाई प्रात्यक्षिकांसाठी वायूदलाचा जोरदार सराव सुरु आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. रोहितच्या संघासमोर आता पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ आठ सामन्यात विजय मिळवला.
रोषणाईने झगमगणार मैदान
अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई केली आहे. प्रेक्षकांना यामुळे आणखी चांगला अनुभव मिळेल. रोषणाई सोबतच संपूर्ण मैदानामध्ये ठिक ठिकाणी स्पीकर्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे गाण्यांसोबतच समालोचनही चाहत्यांना ऐकता येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय भारताचा माजी कर्णधार, विश्वचषक विजेता कर्णधार धोनीही अहमदाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. अहदाबादमध्ये सध्या सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात आली आहे. एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेलाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राजकीय नेतेही उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
Related
Articles
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा अर्ज दाखल
29 Oct 2024
आयटी क्षेत्रात नव्या संधी
28 Oct 2024
सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृतीचीच आवश्यकता
28 Oct 2024
मोहम्मद रिझवान पाकिस्तानचा नवीन कर्णधार
29 Oct 2024
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर
28 Oct 2024
‘उत्क्रांती’वाद्यांचा सन्मान
27 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पुण्यातील पाच मतदारसंघांचे चित्र स्पष्ट
2
समाजाच्या उत्थानासाठी ग्रंथालयांची गरज
3
मन उजळणारी दिवाळी
4
आला सण, काढा ‘ऋण’
5
दिवाळी अंक आणि साहित्य रसिक
6
मनसेची परीक्षा (अग्रलेख)