अमृतसरमध्ये पोलिस अधिकार्‍याची हत्या   

अमृतसरः  अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकार्‍याची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सरुप सिंह असे या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. ते नवादा पिंड पोलिस ठाण्यात कार्यरत होते.गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास ते घराबाहेर पडले. मात्र, अर्ध्या तासानंतर त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ दाखवू लागला.
सूत्रांच्या मते, सरुपसिंह हे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी मोटारसायकवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
 
या प्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तपासाची सूत्रे वेगाने फिरवली जात आहेत. त्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.सिंह यांच्या हत्येवरुन राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षाने आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली.

Related Articles