कुत्र्याच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार आता ५ लाख रुपये   

बंगळूर : कुत्रे चावल्याने मृत झालेल्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली. नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी नुकसान भरपाईची हमी न्यायालयात दिली.
 
त्याशिवाय कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाच हजार रुपयेही देण्याचे आश्वासन दिले. तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी महिन्याभरात बैठक घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली.
 
यापूर्वी ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने याबाबत आदेश बजावला होता. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण, संतती नियंत्रण, भटक्या कुत्र्यांवर उपचार आणि निगा याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने जाहीर केली आहेत. त्यात संबंधित ग्रामपंचायतींनी भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चाची भरपाई द्यावी. मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई‌ दिली जावी, असे ही स्पष्ट केले आहे.
 

Related Articles